राज्याच्या विविध भागांतील लाेककलांचा एकत्रित आराखडा तयार करावा : सामंत

    22-Oct-2021
Total Views |
 
 

samant_1  H x W 
 
महाराष्ट्र हे सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न राज्य आहे. राज्याच्या मातीत परंपरेने रुजलेल्या अनेक कला आहेत. देशपातळीवर महाराष्ट्राचे नाव अभिमानाने घेतले जाईल, अशी लाेककला आपण जपली पाहिजे. त्यासाठी लाेककलांचा विभागानुसार एकत्रित आराखडा तयार करावा, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिले.मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र (उदयपूर) आणि शाहीर अमर शेख अध्यासन लाेककला अकादमी संगीत विभाग मुंबई विद्यापीठाच्या विद्यमाने शाहीर अमर शेख जयंती समारंभाचे उद्घाटन सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी सामंत बाेलत हाेते.यावेळी पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे निदेशक साेनी गुप्ता, परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक विनाेद पाटील, मानव्यविद्या विभागाचे अधिष्ठाता डाॅ. राजेश खरात, प्रख्यात दिग्दर्शिका फुलवा खामकर, शाहीर अमर शेख अध्यासन केंद्राचे समन्वयक प्रा. डाॅ. प्रकाश खांडगे, लाेककला अकादमीचे विभाग प्रमुख प्रा. डाॅ. गणेश चंदनशिवे उपस्थित हाेते.