मराठी वाचन संस्कृती प्रगल्भ : नितीन सप्रे

    21-Oct-2021
Total Views |
 
 
महाराष्ट्र परिचय केंद्रातर्फे वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा
 
 
DD_1  H x W: 0
 
साहित्य संमेलने, माेठ्या प्रमाणात प्रकाशित हाेणारे दिवाळी अंक, संगीत नाटके आदींची माेठी परंपरा महाराष्ट्राला लाभली असून, मराठी वाचन संस्कृती प्रगल्भ असल्याचे प्रतिपादन भारतीय माहिती सेवेचे अधिकारी तथा डी. डी. न्यूजचे उपसंचालक नितीन सप्रे यांनी केले.माजी राष्ट्रपती (स्व.) डाॅ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्ताने महाराष्ट्र परिचय केंद्राच्या वतीने आयाेजित वाचन प्रेरणा दिन कार्यक्रमात सप्रे बाेलत हाेते. वाचनाने माणसाच्या ज्ञान कक्षा रुंदावतात आणि व्यक्तिमत्त्व प्रगल्भ हाेते. वाचनाने शब्दसंपदा वाढते आणि अर्जित केलेले ज्ञान इतरांना दिल्याने ज्ञानाचा प्रसार हाेताे, असे सप्रे यांनी सांगितले.
 
महाराष्ट्रात साहित्य संमेलनाची समृद्ध परंपरा आहे, देशातील ही सर्वांत जुनी साहित्य परंपरा आहे. राज्यात दिवाळी अंक प्रकाशित हाेण्याची माेठी परंपरा आहे. या सर्व साहित्यिक चळवळींमुळे महाराष्ट्रात वाचनाची प्रगल्भ परंपरा निर्माण झाली आहे. संगीत नाटक व अन्य कलांचा समृद्ध वारसाही राज्यातील वाचन संस्कृतीला समृद्ध करण्यास महत्त्वाचा ठरल्याचे सप्रे यांनी सांगितले. मराठीतील उत्तम कलाकृतींचा अनुवाद हाेऊन देश-विदेशात मराठी साहित्य पाेहाेचावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.