वेळ कसा पटकन् ‘निघून’ जाईल.

05 Jan 2021 13:10:32

cvgbd3fr_1  H x
 
काेणी प्रभूस्मरणाची गाेष्ट छेडली की माेठ्या तत्परतेने. चलाखपणे लगबगीने आपण म्हणताे, ‘वेळ कुठे आहे ?’ या दाेन्ही गाेष्टी हाती हात घेऊनच चालतात, तेव्हा आपले मन फसवीत आहे असेच म्हणावे लागते.प्रभूस्मरणाची गाेष्ट जेव्हा जेव्हा निघते. तेव्हा तेव्हा मन म्हणतं अगदी झटकन- ‘वेळ काेठे आहे ?’ जेव्हा प्रभूस्मरणाची गाेष्ट नसते तेव्हा मन म्हणते ‘वेळ जात नाही’.वेळ कसा काढायचा ते सांगा.’ तेव्हा अशा या आपल्या मनाला जरा नीट समजून घ्यायचा प्रयत्न करा- ते माेठे प्रवंचक आहे.डिसेप्टिव्ह आहे. हे आपणास दुसरे काेणी समजावू नाही शकणार. आपणास स्वत:लाच हे मन सतत कसे फसवीत आहे. हे आपणास लक्षपूर्वक पाहिले पाहिजे. खरेच वेळ नाही आहे काय ? प्रभुकरता देण्यासाठी एकही तास ज्याच्याजवळ नाही इतका दरिद्री माणूस या पृथ्वीवर काेणी नाही. असा एकही माणूस नाहीयेच, मुळी ! विनाद्निकत आपण आठ तास झाेपेसाठी देत असताे. जर सगळा हिशेब नीट केला असता आणि साठ वर्षे माणूस जगला तर त्यापैकी वीस वर्षे ताे झाेपेत असताे.पुढे हिशेब केला तर बाकीच्या वीस वर्षात ऑफिसला जाणे, दाढी करणे, घरी येणे.आंघाेळ, जेवण यामध्ये खर्च करताे. बाकीची जी वीस वर्षे उरतात ताे ती वेळ ‘घालवण्यात’ घालवताे. कसा वेळ घालवायचा ? आपण हे जीवन घालवण्यासाठी कापून टाकण्यासाठी आलात का ? तर मग एकदम कापूनच का टाकत नाही ? एकाद्या कड्यावरून मारली उडी की वेळ कसा पटकन् ‘निघून’ जाईल.ही ग्रॅज्युअल सुसाईड, हळूहळू आत्महत्या करायचा हा जाे प्रकार आहे, त्याला आपण बाेअरिंग म्हणताे. ते राेजराेज ताजेतवाने कापून टाकायचे. हळूहळू वेळ ‘घालवून’ टाकायचा.
 
Powered By Sangraha 9.0