गुरे सांभाळणारी साेनल मॅजिस्ट्रेट हाेणार

    25-Jan-2021
Total Views |
गरिबीचे रडगाणे न गाता यश मिळविले; राज्यात एलएलबीमध्ये टाॅप
 
बघ._1  H x W: 0
 
उदयपूर, 24 जानेवारी (वि.प्र.) : गुरांची काळजी घेणारी, राजस्थानच्या उदयपूर येथील प्रतापनगरमध्ये छाेटे डेअरी दुकान चालविणाऱ्या ख्यालीलाल शर्मा यांची 26 वर्षांची मुलगी साेनल राजस्थानच्या सेशन काेर्टात फर्स्ट् क्लास मॅजिस्ट्रेट बनणार आहे.
गरीबीचे रडगाणे न गाता देखील अपेक्षित यश मिळविता येते. हे साेनल शर्मा हिने दाखवून दिले आहे. सकाळी झाेपेतून उठल्यावर घराचे अंगण झाडून रांगाेळी काढल्यावर गाेठ्यात जाऊन गायी, म्हशींचे दूध काढणे, शेण काढणे, गाेठा स्वच्छ करून गुरांचे चारा-पाणी करून दूध डेअरीत पाेहचून घरी आल्यावर आईला घरकामात मदत करणे. वडिलांची टेबल खरेदी करण्याची कुवत नाही, याची जाणीव असल्याने साेनल दाेन रिकाम्या तेलाच्या डब्यांचे टेबल बनवून अभ्यास करीत आहे. ती पहाटे 4 वाजता झाेपेतून उठत असे.घरची कामे आटाेपून काॅलेजमध्ये गेल्यावर अगाेदर लायब्ररीत जात असे व श्नय तित्नया नाेटस घेत असे. कारण महाग पुस्तके, गाइड खरेदी करणे, काेचिंग क्लास लावणे. साेनलला परवडत नव्हते.कारण यासाठी तिच्या वडिलांना कर्ज काढावे लागले असते. तिच्या चप्पलेला शेणाचा वास येत असे.काेणत्याही प्रकारची ट्यूशन न लावता साेनल शर्मा बीए, एलएलबी आणि एलएलएम परीक्षेत सर्वप्रथम आली. संपूर्ण राज्यात एलएलबी परिक्षेत टाॅप बनली. यासाठी साेनलला महाराणा मेवाड चॅरिटेबल भामाशाह पुरस्कार मिळाला.राजस्थान, ज्युडिशियल सर्व्हिस परीक्षेचा निकाल हातात पडण्यापूर्वीच उदयपूरच्या स्व.माेहनलाल सुखाडिया विद्यापीठ पदवीदान साेहळ्यात तिला दाेन गाेल्ड मेडल आणि इतर तीन मेडल मिळाली हाेती. साेनल शर्माचा जन्म 7 डिसेंबर 1993 ला झाला.
तिचे वडील ख्यालीलाल शर्मा आणि आई जसबीर या उभयतांनी प्रेमविवाह केला आहे.साेनलची माेठी बहीण लीना शर्मा कॅगमध्ये हिंदीची अनुवादक आहे. छाेटी बहीण किरण शर्मा दिल्ली विद्यापीठात शिकत आहे, तर धाकटा भाऊ हिमांशु अजमेर येथे पत्रकारितेचा काेर्स करीत आहे. त्याला पत्रकारितेत चांगले काम करुन नाव कमवायचे आहे.