एक हसीना थी, एक सुंदरी थी और एक चंदू था

    25-Jan-2021
Total Views |
एकाच वेळी दाेघींवर प्रेम करता येते का? काही जण नाही म्हणतील आणि काही जण हाे म्हणतील. अर्थात, दाेघींवर प्रेम असेल, तरी दाेघींशी लग्न करता येत नाही. पण या महाभागाने मात्र, दाेघींवर प्रेम केले आणि दाेघींशीही लग्न केले.
 
bgj_1  H x W: 0
 
एकाच दिवशी एकाच समारंभात चंदू माैर्य याने जवळचे नातेवाइक आणि मित्र परिवाराच्या उपस्थितीत त्या दाेघींशी एकाच वेळी लग्नगाठ बांधली. हा आगळावेगळा विवाहसाेहळा पार पडला छत्तीसगडमधील बत्सरमध्ये. या लग्नाला 500 वऱ्हाडी उपस्थित हाेते. लग्नातील व्हिडीओ, फाेटाे आणि लग्नपत्रिका सध्या साेशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.चंदू माैर्य हा शेतकरी कुटुंबातील असून, ताे आपल्या कुटुंबाबराेबर नक्षलग्रस्त बस्तर जिल्ह्यातील दुर्गम समजल्या जाणाऱ्या ताकरालाेहांगा गावामध्ये राहताे. चंदू सुमारे तीन वर्षांपूर्वी टाेकापल परिसरामध्ये विजेच्या खांबाचे काम करण्यासाठी गेला हाेता. त्या वेळी त्याची भेट 21 वर्षांच्या सुंदरी काश्यप नावाच्या मुलीशी झाली आणि दाेघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर ते गेल्या तीन वर्षांपासून फाेनवरून एकमेकांच्या संपर्कात हाेते आणि अखेर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.चंदूचे आणि सुंदरीचे प्रेमप्रकरण सुरू हाेऊन वर्षच झाले हाेते, तेवढ्यात चंदू आणखी एकीच्या प्रेमात पडला. ही दुसरी प्रेमिका 20 वर्षांची हाेती आणि तिचे नाव हाेते हसीना बाघेल. हसीना चंदूच्या गावातील एका लग्नसमारंभासाठी आली असता, चंदूने तिला पाहिले आणि ताे तिच्या प्रेमात पडला. हसीनाही चंदूच्या प्रेमात पडली.हसीनानेच तिच्या प्रेमाची कबुली दिली तेव्हा चंदूने तिच्यापासून काहीही न लपवता आपण आधीपासूनच एका मुलीवर प्रेम करताे, असे तिला स्पष्टपणे सांगितलं. तरीही हसीनाने आपण फाेनवरून संपर्कात राहू असे चंदूला सांगितले. चंदूने हसीना आणि सुंदरी या दाेघींनाही एकमेकींबद्दल काेणताही आडपडदा न ठेवता सांगितले हाेते. तरीही या दाेघींनी त्याच्याशी असणारे नाते कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. ‘आम्ही फाेनवरून एकमेकांच्या संपर्कात हाेताे. मात्र, अचानक एक दिवस हसीना माझ्या घरी आली आणि इथेच राहणार असे सांगू लागली. सुंदरीला हे समजले. पण तीही माझ्या घरी राहायला आली. तेव्हापासून आम्ही एकाच घरात एका कुटुंबाप्रमाणे राहताे,’ अशी माहिती चंदूने दिली. चंदूच्या घरात या दाेघींसह त्याचे आई-वडील आणि दाेन भावंडे राहतात.चंदू दाेघींपैकी काेणाशीही लग्न न करता एकत्र राहताे आहे, हे गावकऱ्यांना समजले आणि ते आक्षेप घेऊ लागले. त्याच वेळी चंदूने दाेघींसाेबत एकाच दिवशी एकाच मंडपात लग्न करण्याचा निर्णय घेतला. ‘सतत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांना कंटाळून मी दाेघींशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. दाेघीही माझ्यावर प्रेम करतात. मी त्यांची फसवणूक करू शकत नाही. त्या दाेघींनीही या लग्नाला संमती दिल्यानंतरळ लग्नाचा निर्णय घेतला,’ असे चंदू म्हणाला. हसीनाच्या घरची मंडळी या लग्नाला उपस्थित हाेती. मात्र, सुंदरीच्या घरच्यांनी या लग्नाला विराेध करत लग्नावर बहिष्कार टाकल्याने तिच्या घरचे या लग्नासाठी काेणीच आले नव्हते.