एप्रिलअखेरीस दहावी, बारावीची परीक्षा

    25-Jan-2021
Total Views |

nhj_1  H x W: 0
 
मुंबई, 24 जानेवारी (आ.प्र.) : राज्यात बारावीची लेखी परीक्षा 23 एप्रिल, तर दहावीची लेखी परीक्षा 29 एप्रिलपासून सुरू हाेणार असल्याची घाेषणा शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी मंत्रालयातील पत्रकार परिषदेत केली.यावेळी अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, शिक्षण आयुक्त विशाल साेळंकी, परीक्षा मंडळाचे संचालक दिनकर पाटील उपस्थित हाेते.बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा 1 ते 22 एप्रिलदरम्यान हाेईल, तर लेखी परीक्षा 23 एप्रिल ते 29 मे 2021 या कालावधीत घेण्यात येईल. या परीक्षेचा निकाल जुलैच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर करण्यात येईल.दहावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा 9 ते 28 एप्रिलदरम्यान हाेतील, तर लेखी परीक्षा 29 एप्रिल 2021 ते 31 मे या कालावधीत घेण्यात येतील.या परीक्षेचा निकाल ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर करण्यात येईल. काेराेना प्रतिबंधाबाबत केंद्र व राज्य शासन, तसेच आराेग्य विभागाने वेळाेवेळी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकाेरपणे पालन करत या परीक्षा घेण्यात येणार असल्याचे वर्षा गायकवाड यांनी सांगितले.