आजारी पडल्यावर सल्ला घ्या; मनाने औषध घेणे टाळा

25 Jan 2021 11:01:45
प्रत्येक व्यक्तीची प्रकृती, वय आणि लक्षणांनुसार औषधे दिली जातात
 
क्द्फ._1  H x W
 
संध्यानंद.काॅम आपल्या आयुष्यात आराेग्याला अनन्यसाधारण महत्त्व द्यावयास हवे. शरीर निराेगी असेल तर सगळ्या सुखांना अर्थ असताे. सुयाेग्य आहार, पुरेशी विश्रांती आणि वयाला झेपेल एवढ्या नियमित व्यायामामुळे आराेग्य चांगले ठेवता येते. पण तरीही त्याची शंभर टक्के खात्री देता येत नाही. सगळे आजार गंभीर नसतात. काही वेळा दाेन-तीन दिवसांत किंवा फारतर आठवडाभरात आपण व्यवस्थित हाेताे.आजाराची लक्षणे जाणवायला लागल्यावर वेळेत डाॅ्नटरांकडे जाणे, औषधे घेणे, ती कशी घ्यावीत याची माहिती घेणे आणि ते वेळापत्रक पाळणे महत्त्वाचे असते. काेणाच्या तरी सल्ल्यावरून त्याने सांगितलेल्या औषधांचे प्रयाेग स्वत:वर न करणे शहाणपणाचे असते. औषध तेच असले तरी व्यक्तीच्या प्रकृतीनुसार त्याची मात्रा बदलते हे लक्षात ठेवा आणि तज्ज्ञांचा सल्ला घेऊन ती वापरा. सध्या चर्चेत आहे ती ‘काेव्हिड-19’ची लस. हरियाणाचे एक मंत्री अनिल विज यांनी सुरुवातीच्या काळात ती घेतली आणि नंतर 15 दिवसांनी त्यांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला. त्यातून अनेक प्रश्न सामाेरे आले आहेत. ही लस प्रभावी आहे का, या लशीच्या निर्मितीसाठी देशाने काेट्यवधी रुपये खर्च करण्याची गरज आहे का, ही लस दिली जाणारे ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांच्या सुरक्षेचे काय, असे मुद्दे उपस्थित झाले आहेत. ‘फायझर’ कंपनीतील माजी मुख्य शास्त्रज्ञ डाॅ. मायकेल येडाॅन काय म्हणतात ते पाहा. ‘सध्याच्या महामारीवर लशीची मुळीच गरज नाही. लशीबाबतची एवढी चर्चा मी यापूर्वी कधी ऐकली नव्हती. एखाद्या आजाराचा संसर्ग हाेण्याचा धाेका नसलेल्यांचे लशीकरण करण्याची गरज नाही,’ असे त्यांनी स्पष्ट केले आहे.लशीच्या चाचण्यांसाठी आणखी वेळ मिळावयास हवा असे मत ‘फायझर’चे अध्यक्ष अल्बर्ट बाेऊराला यांनीही व्यक्त केले असून, आणखी अभ्यासाची गरज त्यांनी व्यक्त केली आहे. लस दिलेल्या व्यक्तीपासून संसर्गाचा प्रसार हाेताे का, याचा अभ्यास करण्याची गरज आहे.
 
Powered By Sangraha 9.0