एसटी विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती याेजना

    25-Jan-2021
Total Views |
 
hk_1  H x W: 0
 
नाशिक, 24 जानेवारी (आ.प्र.) : आदिवासी विकास विभागामार्फत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी विविध याेजना राबवण्यात येतात.आदिवासी विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी आदिवासी विकास विभागामार्फत शिष्यवृत्ती दिली जाणार असल्याची माहिती आदिवासी विकास विभागाचे आयुक्त हिरालाल साेनवणे यांनी दिली आहे.या शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्याचे कमाल वय 35 वर्ष असावे. नाेकरी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी कमाल वयाेमर्यादा 40 वर्ष आहे. विद्यार्थ्याच्या पालकाची वार्षिक उत्पन्न मर्यादा 6 लाख इतकी आहे, तसेच परदेशात उच्च शिक्षणासाठी आवश्यक टाेफेल किंवा आμयईएलटीएस परीक्षा उत्तीर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राधान्य राहील. परदेशी शिष्यवृत्तीसाठी दरवर्षी मेमध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल. विद्यार्थ्यांनी संबंधित प्रकल्प अधिकाऱ्यांकडे अर्ज जमा करावेत, असे आवाहन साेनवणे यांनी केले आहे.प्राप्त अर्जांची प्रकल्प स्तरावर अपर आयुक्तांमार्फत छाननी हाेऊन ते आदिवासी विकास आयुक्तालयाकडे सादर केले जातील. त्यानंतर आयुक्तालय स्तरावर स्थापन निवड समितीद्वारे 10 विद्यार्थ्यांची निवड केली जाईल. ज्या विद्यापीठाचे रँकिंग 300 पर्यंत आहे त्याच विद्यापीठात प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती देय असणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.