‘दिलखुलास’मध्ये बलदेव सिंह यांची मुलाखत

    25-Jan-2021
Total Views |

cdf_1  H x W: 0 
मुंबई, 24 जानेवारी (आ.प्र.). : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास या कार्यक्रमात मतदार व्हा, देशाच्या विकासासाठी याेगदान द्या या विषयावर मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांची विशेष मुलाखत प्रसारित हाेणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून साेमवारी (25 जानेवारी) सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित हाेईल. निवेदिका सुषमा जाधव यांनी ही मुलाखत घेतली आहे.देशात 25 जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला जाताे.या दिनाचे औचित्य साधून ही मुलाखत घेण्यात आली आहे. राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त राज्यभर राबवण्यात येणारे उपक्रम, मतदार यादीत नावे नाेंदवण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांमार्फत करण्यात येणारी जनजागृती, मतदार यादीत नाव नाेंदवण्यासाठी उपलब्ध असलेले पर्याय, मतदार दिनाचे घाेषवाक्य, आधुनिक तंत्रज्ञानाचा मतदार जागृतीसाठी वापर आदी विषयांची माहिती बलदेव सिंह यांनी दिलखुलास कार्यक्रमातून दिली आहे.