गरम पाण्याचेही हाेऊ शकतात दुष्परिणाम

    25-Jan-2021
Total Views |
गरम पाण्यामुळे सामान्य तापमानाच्या पाण्याच्या तुलनेत किडनींवर अधिक दाब पडताे.किडनीच्या कार्यपद्धतीवर परिणाम हाेऊ शकताे.
 
gj_1  H x W: 0
 
पाण्याला जीवन असे म्हटले जाते. खरेच पाण्याशिवाय आपण जगू शकत नाही. डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार आपण राेज 2 ते 4 लिटर पाणी प्यायला हवे. शिवाय गरम पाणी प्यायल्याने तर अनेक राेग दूर हाेतात, असे म्हटले जाते.गरम पाणी पिण्यामुळे आराेग्याचे काय फायदे हाेतात आणि ते काय आहेत, याचीही माहिती तुम्हाला मिळालेली असेल. पण गरम पाणी पिण्यामुळे काही अपायही हाेतात, याची तुम्हाला कल्पना नसेल. हे आहेत त्याचे दुष्परिणाम.
 
किडनीवर परिणाम
 
किडनींना विशेष रक्तवाहिन्यांची यंत्रणा असते. या यंत्रणेमुळे अतिरिक्त पाणी आणि विषारी द्रव्ये बाहेर टाकली जातात.
गरम पाण्यामुळे सामान्य तापमानाच्या पाण्याच्या तुलनेत किडनींवर अधिक दाब पडताे. त्यामुळे किडनीच्या कार्यपद्धतीवर परिणाम हाेऊ शकताे. त्यामुळेच राेज गरम पाणी पिऊ नये. गरम पाणी प्यावे पण मर्यादेत.
 
ओठ भाजणे
 
आपण जेव्हा गरम पाणी पिताे, तेव्हा आपले ओठ भाजत असतात. त्यामुळे गरम पाणी प्यायचेच असेल, तर काेमट पाणी प्या. आणि माेठे घाेट न घेता लहान लहान घाेट घ्या.
 
ताेंडाची जळजळ
 
सतत गरम पाणी प्यायल्याने ताेंड येण्याची समस्या उद्भवू शकते. किंवा ताेंडाची जळजळ हाेऊ शकते.