सुशांतसिंहच्या स्मरणार्थ कॅलिफाेर्नियात फंड

    25-Jan-2021
Total Views |

व्फ्ग._1  H x W 
 
कॅलिफाेर्निया, 24 जानेवारी (वि.प्र.) : दिवंगत भारतीय चित्रपट अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या स्मरणार्थ कॅलिफाेर्निया विद्यापीठात एसएसआर मेमाेरियल फंडाची सुरुवात झाली आहे.सुशांतच्या 35 व्या जयंतीनिमित्त हा फंड सुरू करण्यात आला आहे.सुशांतला अ‍ॅस्ट्राेफिज्निसची खूप आवड हाेती. सुशांतची बहीण श्वेतासिंह किर्तीने सुशांतच्या चाहत्यांना आवाहन केले आहे की, ज्या तरुणांना अ‍ॅस्ट्राेफिज्निसची आवड असेल, त्यांनी फंडासाठी कॅलिफाेर्निया विद्यापीठाकडे अर्ज करावा. कॅलिफाेर्निया राज्यातील युसी बर्कली येथे 35,000 डाॅलरचा सुशांतसिंह राजपूत स्मृती निधी स्थापन करण्यात आला.ज्या तरुणांना युसी बर्कले येथे अ‍ॅस्ट्राेफिज्निसमध्ये करिअर करायचे आहे, ते तेथे अर्ज करू शकतात, असे श्वेतासिंह किर्तीने आवाहन केले आहे.