ई-ईपिक वाटपास आजपासून प्रारंभ

25 Jan 2021 12:03:16
 
njk_1  H x W: 0
 
मुंबई, 24 जानेवारी (आ.प्र.) : राष्ट्रीय मतदार दिनाच्या निमित्ताने साेमवारी (25 जानेवारी) राज्यभरात कार्यक्रम आयाेजिण्यात आले आहेत. मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे राज्यस्तरीय मुख्य कार्यक्रम हाेणार आहे, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांनी दिली. या दिवसापासून निवडणूक आयाेग ई-मतदार ओळखपत्राचे (ई-ईपिक) वाटप सुरू करणार असून, मतदारांना त्यांचे मतदार ओळखपत्र माेबाइल अथवा संगणकावर डाऊनलाेड करता येणार आहे.यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये हाेणाऱ्या या कार्यक्रमास राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान, राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयाेगाचे अध्यक्ष डाॅ. अनिल काकाेडकर, सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव (सेवा) सुजाता साैनिक, मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल, राज्याचे काेविड टास्क फाेर्स प्रमुख डाॅ. संजय ओक, काेकण विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ, अभिनेत्री व सदिच्छा दूत निशिगंधा वाड उपस्थित राहणार आहेत.
 
Powered By Sangraha 9.0