डाॅगी बनला मानद पदवीधर

    25-Jan-2021
Total Views |
 
vb_1  H x W: 0
 
कॅराेलिना, 24 जानेवारी (वि.प्र.) : अमेरिकेच्या एका विद्यापीठाने ग्रिफिन नावाच्या कुत्र्याला मानद पदवी प्रदान केली आहे. कारण या कुत्र्याने ब्रिटनी हाऊली नावाच्या दिव्यांग विद्यार्थिनीला माेलाची मदत केली हाेती.उत्तर कॅराेलिनामधील विल्सन येथील रहिवासी ब्रिटनीचे पाय निकामी झाल्याने ती व्हीलचेअर वापरते. ती एका गंभीर आजाराचा सामना करीत आहे. ती आपली कामे सुद्धा करू शकत नाही. तिला काेणत्याही वस्तूची गरज लागली तर ग्रििफन तिला त्वरित आणून द्यायचा.दरवाजा उघडायचा असाे की लाईट लावणे, बंद करणे असाे हा कुत्रा ब्रिटनीच्या संकेतानुसार सर्व कामे त्वरित करताे.ताे प्रत्येक काम टापटीपीने करताे ब्रिटनी हाऊलीचा ऑक्युपेशनल थेरपीद्वारे इलाज सुरू आहे. गाेल्डन रिट्रीव्हर प्रजातीच्या या कुत्र्याला क्लार्कसन विद्यापीठाने त्याच्या या सेवाभावी वृत्तीचा मानद पदवी देऊन गाैरव केला आहे. कुत्र्यावर प्रेम करणारी अनेक माणसे जगात आहेत.काही श्रीमंत लाेकांनी आपल्या संपत्तीचे वारस कुत्र्यांनाच केले आहे.