प्लॅस्टिक, कागदी राष्ट्रध्वजांचा वापर नकाे

25 Jan 2021 11:39:46
 
cd_1  H x W: 0
 
मुंबई, 24 जानेवारी (आ.प्र.) : 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 1 मे व इतर राष्ट्रीय कार्यक्रम, महत्त्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा सामन्यांवेळी कार्यक्रम पार पडल्यानंतर खराब झालेले, माती लागलेले, मैदानात, रस्त्यांवर, तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी इतस्ततः पडलेले राष्ट्रध्वज गाेळा करून ते तहसील कार्यालयात व जिल्हास्तरावर निर्माण करण्यात आलेल्या यंत्रणेस सुपूर्त करण्याचे अधिकार अशासकीय संस्था, तसेच इतर संघटनांना सुपूर्त करण्यात आले आहेत, अशी माहिती मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली. राज्य शासनाच्या गृह विभागाच्या परिपत्रकान्वये प्लॅस्टिक व कागदी राष्ट्रध्वजांचा वापर थांबवण्यास जनजागृतीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा व तालुका पातळीवर समित्या स्थापन कराव्यात, असे सूचित केले आहे.
Powered By Sangraha 9.0