मुंबईचा काेस्टल झाेन मॅनेजमेंट प्लॅनचा मसुदा अंतिम करण्याची केंद्राकडे मागणी

    25-Jan-2021
Total Views |

cfg_1  H x W: 0 
 
मुंबई, 24 जानेवारी (आ.प्र.) : बृहन्मुंबईचा काेस्टल झाेन मॅनेजमेंट प्लॅनचा (सीझेडएमपी) मसुदा अंतिम करण्याची प्रक्रिया गतिमान हाेण्याच्या दृष्टीने संबंधित नॅशनल सेंटर फाॅर सस्टेनेबल काेस्टल मॅनेजमेंट (एनसीएससीएम) या प्राधिकृत संस्थेस आवश्यक सूचना द्याव्यात, अशी विनंती राज्याचे पर्यावरण आणि वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय पर्यावरण, वने आणि वातावरणीय बदल मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्राद्वारे केली आहे.चेन्नईतील एनसीएससीएम या संस्थेने मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे आणि पालघर जिल्हा क्षेत्राच्या काेस्टल झाेन मॅनेजमेंट प्लॅनचा मसुदा तयार करण्याचे काम केले आहे. यावर सार्वजनिक सुनावणीही जिल्हास्तरावर घेण्यात आली आहे. सर्वाेच्च न्यायालयही महाराष्ट्र काेस्टल झाेन मॅनेजमेंट अ‍ॅथाॅरिटी विरुद्ध केंद्र सरकार या खटल्यात काेस्टल झाेन मॅनेजमेंट प्लॅन-2019 च्या मसुद्याचा आढावा घेत असून, मुंबईचा काेस्टल झाेन मॅनेजमेंट प्लॅन-2019 चा मसुदा लवकर अंतिम हाेणे अपेक्षित आहे. नॅशनल काेस्टल झाेन मॅनेजमेंट अ‍ॅथाॅरिटीने 28 ऑगस्ट 2020 राेजी यासंदर्भात आढावा घेतला असून, यात राज्यातील काेस्टल झाेन मॅनेजमेंट प्लॅन-2019 च्या मसुदा तांत्रिक छाननी समितीसमाेर तपासणीसाठी ठेवला जाईल, असे नॅशनल सेंटर फाॅर सस्टेनेबल काेस्टल मॅनेजमेंट (एनसीएससीएम) संस्थेने सांगितले आहे. त्यानुसार तांत्रिक छाननी समितीची बैठक 20 नाेव्हेंबरला चेन्नईत झाली असून, या बैठकीत मुंबईच्या काेस्टल झाेन मॅनेजमेंट प्लॅन-2019 च्या मसुद्यावर विस्तृत चर्चा झाली.