महाराष्ट्राचा वारकरी संतपरंपरेवरील चित्ररथ सज्ज

    25-Jan-2021
Total Views |
राजपथावरील उद्याच्या संचलनात सर्वांचे वेधून घेणार लक्ष; कलाकारांत प्रचंड उत्साह
 
vh_1  H x W: 0
 
नवी दिल्ली, 24 जानेवारी (आ.प्र.) : वारकरी संतपरंपरेवर आधारित महाराष्ट्राचा लक्षणीय चित्ररथ यंदा प्रजासत्ताकदिनी हाेणाऱ्या राजपथावरील संचलनासाठी सज्ज झाला आहे. चित्ररथासाेबत सहभागी हाेणाऱ्या कलाकारांत प्रचंड उत्साह बघायला मिळत असून, चित्ररथाची बांधणीही पूर्ण झाली आहे.महाराष्ट्रासह 17 राज्ये आणि 15 केंद्रीय मंत्रालये, असे एकूण 32 चित्ररथ राजपथावरील संचलनात सहभागी हाेणार असल्याचे संरक्षण मंत्रालयाचे जनसंपर्क अधिकारी नम्पीबाै मरिनमई यांनी राष्ट्रीय रंगशाळेतील पत्रकार परिषदेत सांगितले.महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने चित्ररथाच्या संकल्पनेपासून ते चित्ररथ बांधणी व कलाकारांच्या सरावासह प्रत्यक्ष चित्ररथ संचलनाचे कार्य पार पडते. राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख, राज्यमंत्री डाॅ.
राजेंद्र पाटील-यड्रावकर आणि विभागाचे सचिव साैरभ विजय यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राच्या संतांची थाेर परंपरा दर्शवणारा चित्ररथ सादर करण्याचा निर्णय झाला आणि विभागाने ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवत सुंदर व सुबक चित्ररथ तयार केल्याचे सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे यांनी परिचय केंद्राशी बाेलताना सांगितले.या चित्ररथावर एकूण चार फिरत्या मूर्ती साकारण्यात आल्या असून, त्यासाठी यवतमाळचे राजेश टेंभरे आणि अंकुश टेंभरे या पिता-पुत्रांनी तंत्रज्ञ म्हणून चाेख भूमिका बजावली. वारकऱ्यांच्या वेशात मृदंग, टाळ आणि वीणाधारी चार कलाकार चित्ररथावर असणार आहेत.याशिवाय चित्ररथाच्या उजव्या व डाव्या बाजूला प्रत्येकी चार कलाकार वारकऱ्यांच्या वेशात असणार आहेत.ठाण्यातील कलांकुर ग्रूपचे 12 कलाकार या भूमिका साकारणार आहेत.