कांजण्या : लहानपणी आल्या नसतील, तर माेठेपणी येण्याची शक्यता

    25-Jan-2021
Total Views |
 
क._1  H x W: 0
 
कांजण्या हा लहान मुलांना हाेणारा संसर्गजन्य आजार आहे. 10 वर्षांच्या आत असणाऱ्या मुलांमध्ये हा आजार हाेताे. जर लहानपणी कांजण्या आल्या नसतील, तर माेठेपणी येण्याची शक्यता असते.यात सुरुवातीला एक दाेन दिवस ताप येऊन नंतर पायावर, पाेटावर, पाठीवर पाण्यासारखा स्राव असणारे फाेड येतात. हे फाेड फुटल्यानंतर त्वचेवर काही दिवस काळसर डाग राहतात. हा आजार हिवाळ्यात तसेच वसंत ऋतूत हाेताे.हा आजार विषाणूंमुळे हाेताे. हा आजार संसर्गजन्य असताे.विषाणू दूषित हवा, दूषित वस्त्र, तसेच लहान मुलांच्या फाेडांपासून एका व्य्नतीकडून दुसऱ्या व्य्नतीकडे थेट संसर्ग हाेऊ शकताे.कांजण्याचा कालावधी 7 ते 21 दिवसांचा असताे. एकदा कांजण्या झाल्या की, त्या व्य्नतीमध्ये राेगप्रतकार क्षमता निर्माण हाेते, त्यामुळे आयुष्यात पुन्हा कांजण्या हाेत नाहीत. यात सुरुवातीला ताप येताे.शरीरावर फाेड येऊ लागतात. अंग दुखणे, खाज सुटणे, खाेकला, सर्दी ही लक्षणे आढळतात.