‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मधील पाेपटलालचे झाले चार हात

    23-Jan-2021
Total Views |
 
sdftg_1  H x W:
 
मुंबई, 22 जानेवारी (वि.प्र.) : गेली अनेक वर्षे प्रेक्षकांच्या मनावर ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका राज्य करत आहे. ही मालिका मालिकांच्या विषयांमधील ताेच ताे एकसारखेपणा टाळत प्रेक्षकांचे अविरत निखळ मनाेरंजन करत आहे. गाेकुळधाम साेसायटीत राहणारे जेठालाल, दयाबेन, भिडे, माधवी, काेमल, बबिता, अंजली ही सर्वच पात्र खूप प्रसिद्ध आहेत. पण, त्यातील पाेपटलाल हे पात्र खूपच रंजक असून, लग्नाचे वय उलटूनही पाेपटलाल अद्याप बाेहल्यावर न चढल्याने कावराबावरा झाल्याचे आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळालाे हाेते. पण, त्याच पाेपटलालचे अखेर घाेडे गंगेत न्हाले आहे. कारण पाेपटलाल आता विवाहबद्ध झाला आहे.गाेकुळधाम साेसायटीत राहणाऱ्या पाेपटलालच्या घराच्या बाल्कनीत काही दिवसांपूर्वी एक नवविवाहित तरुणी उभी असल्याचे दिसून आले. विशेष म्हणजेसाेसायटीतील सदस्यांनादेखील या मुलीला पाहून धक्का बसला आहे. पण, खरंच पाेपटलालने लग्न केले आहे, यावर त्यांचा आता विश्वास बसला आहे. त्याचबराेबर आता संपूर्ण गाेकुळधाम साेसायटी या नवविवाहितेचे स्वागत करण्यासाठी नवीन प्लॅन करत आहे.दरम्यान, केवळ गाेकुळधाम साेसायटीतील रहिवाशांनाच नव्हेतर ही मालिका पाहणाऱ्या सर्वसामान्य प्रेक्षकांनादेखील पाेपटलालचे लग्न कधी हाेणार हा प्रश्न पडला हाेता. पण, आता पाेपटलालचे दाेनाचे चार हात झाले असून, ही मालिका आता या पुढे काेणत्या रंजक वळणावर जाणार हे आगामी भागातून आपल्यास पाहायला मिळणार आहे.