अंधारात रस्ता दाखविणारे स्मार्ट बूट

    23-Jan-2021
Total Views |

fr_1  H x W: 0  
 
लंडन, 22 जानेवारी (वि.प्र.) : आजही ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये वीज नाही. त्यामुळे अंधारात चालताना एक प्रकारची अनामिक भीती वाटत असते. परंतु ब्रिटनमधील नाॅटिंगहम टेंट युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी ही भीती दूर करणारे स्मार्ट बूट तयार केले आहेत. या शास्त्रज्ञांनी पारंपरिक बुटाच्या लेसमध्ये बारीक एलईडी बल्ब बसविले आहेत. हे बूट पायात घालून चालत असताना हे बल्ब प्रकाश देतात व अंधारातही बिनधास्त चालता येते.हिवाळ्यात फिटनेस प्रेमी तरुणांसाठी हे स्मार्ट बूट अतिशय उपयु्नत ठरतील. हे बूट जाॅगर्ससाठी तयार करण्यात आले आहेत. येत्या तीन महिन्यात या स्मार्ट बुटांचे व्यावसायिक पातळीवर उत्पादन सुरू हाेणार आहे. विशेष म्हणजे हे बूट पावसाळ्यातही खराब हाेणार नाहीत कारण लेसमध्ये बसविलेले एलईडी बल्ब वाॅटरप्रूफ रे्निझनद्वारे फिट केले आहेत. यामुळे पाण्याने भिजले तरी हे बूट खराब हाेणार नाहीत.इतर बुटांप्रमाणेच हे स्मार्ट बूट धुता येतात.
हे बूट फार्नबाेराे येथील ्निवनेट्नियू इंजिनिअरिंग कंपनीने तयार केले आहेत. हिवाळ्याच्या रात्रीत हे बूट अ‍ॅथलेटस, फिटनेस प्रेमी आणि सायकल चालकांसाठी वर्दळीच्या रस्त्यावर चालण्यासाठी उपयुक्त ठरतील, असे कंपनीने प्रतिपादन केले आहे.