आता लग्नपत्रिकेवरही क्यू आर काेड!

    23-Jan-2021
Total Views |
आहेराची र्नकम थेट बँकेत भरण्याची साेय
 
फ्घ._1  H x W:
 
मदुराई, 22 जानेवारी (वि.प्र.) : काेराेना काळात विवाहात फ्नत 20 ते 50 पाहुण्यांनाच सहभागी हाेण्याचे बंधन सरकारने घातले हाेते. विवाहामध्ये आहेराला विशेष महत्त्व आहे, पण पाहुणेच कमी असल्याने आहेर जास्त कसा येणार? यावर तामिळनाडु राज्यातील एका व्यक्तीने आहेर ‘राेख’ मिळावा यासाठी वधूपक्षाने अफलातून यु्नती केली. लग्नपत्रिकेवर त्यांनी चक्क क्यू आरकाेड छापला.
यामुळे लग्नाला आले नाही तरी चालेल, पण क्यू आर काेडद्वारे आहेराची र्नकम थेट बँकेत वधू-वराच्या नावावर जमा करून वधू-वरांना आशीर्वाद देण्याचे आवाहन करण्यात आले हाेते.यामुळे आहेर करणाऱ्या नातेवाइकांची नावे वहीत लिहून ठेवण्याची कटकट राहिली नाही. ‘साेयरिक’ झाल्यावर वधूपक्षाकडे आणि विवाह मुहूर्ताच्या एक दिवस अगाेदर वरपक्षाकडे आहेर करण्याची प्रथा आहे. याला ‘नानमुख’ असे म्हणतात. आता मदुराईच्या वधूपक्षाने लग्नपत्रिकेवर क्यू आर काेड छापून आहेराची र्नकम परस्पर बँकेत जमा करण्याची नवी प्रथा सुरू केली आहे.वधूच्या लग्नपत्रिकेवर ‘फाेनपे’ आणि गुगल पे अकाऊंटचा क्यू आर काेड छापला हाेता. परंतु, याचा फ्नत 30% नातेवाइकांनीच वापर केला, असे वधूची आई टी. जे. जयंती यांनी सांगितले. एका बाजूला लग्नपत्रिकेवर ‘कृपया आहेर आणू नये’ अशी विनंती केली जात आहे. यामुळे आहेर प्रथा बंद हाेण्याची शक्यता दिसत असता मदुराईच्या वरपक्षाने आहेर स्वीकारण्याची नवी पद्धत सुरू केली आहे.