राेगप्रतिकार शक्तीमधून कर्कराेगावर मात शक्य

    23-Jan-2021
Total Views |
मिसुरी विद्यापीठातील नवे संशाेधन
 
कड._1  H x W: 0
 
वाॅशिंग्टन, 22 जानेवारी (वि.प्र.) : कर्कराेगावर शरीरातील प्रतिकारशक्तीद्वारे मात करता येईल, असा विश्वास मिसुरी विद्यापीठातील संशाेधकांनी व्यक्त केला आहे. या विद्यापीठातील सहायक प्राध्यापक येविस चाबू यांनी याबाबत संशाेधन केले.ते म्हणाले, की आपल्या शरीरातील राेगप्रतिकार करणाऱ्या पेशी सतत फिरत असतात. शरीरात एखादी परकी वस्तू दिसल्यावर तिचा नाश करणे हे त्यांचे काम असते; पण या पेशींनी आपला नाश करू नये म्हणून अन्य पेशी ‘मला खाऊ नकाे’ अशी सूचना या पेशींना करतात. त्यासाठी एक प्रकारचा रेण्वीय संदेश दिला जाताे; पण या पेशींची नक्कल करण्याचे तंत्र काही प्रकारच्या कर्कराेगांत दिसून आले आहे.म्हणजे कर्कराेगाच्या पेशीसुद्धा ‘मला खाऊ नकाे’ असे संदेश देतात. पेशी राेगग्रस्त आहे की नाही याची ओळख राेगप्रतिकार पेशींना हाेत नाही आणि कर्कराेगाच्या पेशी वाढत जातात. पण, ‘इम्युनाेथेरपी’मध्ये वापरली जाणारी औषधे मात्र राेगग्रस्त पेशींचा ‘मला खाऊ नकाे’ हा संदेश राेखतात आणि त्यामुळे संरक्षक पेशी अशा पेशींचा नाश करू शकतात.सध्या मात्र ही औषधे सरसकट सर्व प्रकारच्या कर्कराेग पेशींचे संदेश राेखू शकत नसल्याचे त्यांनी सांगितले. कर्कराेग एकाच प्रकारचा असला, तरी प्रत्येक रुग्णात त्याची तीव्रता कमी-जास्त असते. त्यामुळे ही औषधे अधिक परिणामकारक करण्यावर संशाेधन सुरू असल्याची माहिती प्रा. चाबू यांनी दिली.