व्हर्च्युअल मीटिंग्जनी दिली पर्सनॅलिटीची जाणीव

    23-Jan-2021
Total Views |
घरून काम करताना व्यवस्थित दिसण्याची गरज लाेकांना पटली आहे.
 
 
द्र्थ्ज._1  H x
 
संध्यानंद.काॅम आपण चांगले दिसावे ही नैसर्गिक इच्छा आहे. केवळ महिलाच नव्हेतर पुरुषही आता आपल्या ‘दिसण्या’विषयी जागरूक हाेऊ लागले आहेत. बाजारातील साैंदर्यप्रसाधनांचा वाढता खप त्याची साक्ष देताे. काेराेना महामारीपूर्वी कार्यालयात जाऊन काम करण्याच्या काळात माेज्नया साैंदर्यप्रसाधानांचा वापर पुरेसा ठरत हाेता; पण झूम मीटिंग्जमुळे सगळे चित्र बदलून गेले आहे. घरून काम करताना अशा मीटिंग्ज अपरिहार्य असतात आणि संबंधित व्य्नती कॅमेऱ्यापुढे असते. साहजिकच जास्तीत जास्त व्यवस्थित दिसण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न असताे. लाॅकडाऊनच्या काळात अनेकांनी स्वयंपाकासह विविध काैशल्यांवर लक्ष केंद्रित केले हाेते. आता ते वळाले आहे आकर्षक दिसण्याकडे.व्हर्च्युअल बैठकांमध्ये चेहरा आणि मान-छातीपर्यंतचा भाग जास्त दिसत असल्यामुळे त्यातील वैगुण्य दूर करण्याचे प्रयत्न लाेकांनी सुरू केले आहेत.मुंबईतील एका बहुराष्ट्रीय कंपनीत काम करणाऱ्या नेहा (नाव बदलले आहे) म्हणतात, ‘मला नेहमी झूम बैठका अटेंड कराव्या लागत असल्यामुळे व्यवस्थित दिसणे भाग आहे आणि त्यामुळे मला त्याची चिंता असते. बाेलताना माझे दात, त्वचा व्यवस्थित दिसेल याची काळजी मला करावी लागते. त्यामुळे मला साैंदर्य आणि त्वचातज्ज्ञांच्या भेटी घेऊन उपाय करावे लागले आणि त्यासाठी खूप खर्च झाला.’ लाॅकडाऊनच्या काळात अमेरिकेत चेहऱ्याच्या प्लॅस्टिक सर्जरीचे प्रमाण खूप वाढल्याचे ‘फेशियल प्लॅस्टिक सर्जरी अँड अ‍ॅस्थेटिक मेडिसीन’ या नियतकालिकातील एका लेखात नमूद करण्यात आले असून, व्हर्च्युअल मीटिंग्जचा हा मानसिक परिणाम आहे की नवे फॅड, अस प्रश्न त्यात करण्यात आला आहे.अमेरिकेएवढे नसलेतरी भारतातही अशा शस्त्रक्रियांचे प्रमाण वाढत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ‘काेराेनापूर्व काळात लाेक त्वचेकडे एवढे लक्ष देत नव्हते.