पाच आडनावे असलेले जगात 83 काेटी लाेक

    23-Jan-2021
Total Views |
 
बघ्ज._1  H x W:
 
बिजिंग, 22 जानेवारी (वि.प्र.) : चीनची लाेकसंख्या जगात सर्वांत जास्त म्हणजे 144 काेटी 23 लाख 88 हजार 409 आहे, पण इत्नया प्रचंड लाेकसंख्या असलेल्या देशात आडनावांचा दुष्काळ असून, या देशात आडनावांची संख्या फ्नत 6 हजार आहे. त्यापैकी वांग, ली, झांग, लिऊ आणि चेन ही आडनावे जास्त लाेकांची आहेत. ही पाच आडनावे तब्बल 83.3 काेटी लाेक वापरतात. तर 100 आडनावे वापरणाऱ्या लाेकांची संख्या 86% आहे, तर संपूर्ण चीनमधील आडनावांची अधिकृत संख्या 6 हजार आहे. एकेकाळी चीनमध्ये 20 हजार पेक्षा जास्त आडनावे अधिकृत हाेती. परंतु आपल्या नावापुढे आडनाव लावणाऱ्या लाेकांची संख्या दिवसेंदिवस कमी हाेत आहे.चीनमध्ये ज्या राजाचे साम्राज्य असेल त्या राजाचे आडनाव बाकीची प्रजाही वापरत असे. त्यामुळेही चीनमध्ये आडनावांची संख्या कमी आहे. सरकारकडे आडनावांचा डिजिटल डेटाबेस नाही. लाेकांना बँकेत खाते उघडणे, ऑनलाइन पेमेंट यासारख्या अडचणी एकाच नावाचे व आडनावाचे लाेक असल्यामुळे येतात. यामुळे सरकार आता लाेकांना आडनाव बदलण्याचा सल्ला देत आहे.