‘मानाचा मुजरा’ कार्यक्रमाच्या वाढीव खर्चासंबंधी दिलेल्या आदेशाला आव्हान देणार

23 Jan 2021 13:11:10
विजय पाटकर, प्रिया बेर्डे, अलका कुबल यांची माहिती; धर्मादाय आयुक्तांच्या आदेशाविरुद्ध न्यायालयात दाद मागणार
 
वफ._1  H x W: 0
 
पुणे, 22 जानेवारी (आ.प्र.) : ‘मानाचा मुजरा’ या 2015 मध्ये झालेल्या कार्यक्रमाच्या वाढीव खर्चासंबंधी झालेल्या तक्रारीवर धर्मादाय आयुक्तांनी दिलेल्या आदेशाला न्यायालयात आव्हान दिले जाणार आहे. यासंदर्भातील माहिती अभिनेते आणि चित्रपपट महामंडळाचे तत्कालिन सदस्य विजय पाटकर, प्रिया बेर्डे, अलका कुबल, मिलिंद अष्टेकर यांनी दिली आहे. त्यांनी गुरुवारी (21 जानेवारी) पुण्यात एक पत्रकार परिषद घेतली. त्या वेळी महामंडळाचे विद्यमान उपाध्यक्ष धनाजी यमकर, माजी कार्यवाह रणजित जाधव, इम्तियाझ बारगीर उपस्थित हाेते.मराठी चित्रपटसृष्टीच्या शताब्दीनिमित्त मानाचा मुजरा हा तीन दिवसीय कार्यक्रम काेल्हापूर येथे झाला. मराठी चित्रपट महामंडळातर्फे काेल्हापूर येथे 2015 मध्ये या कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. या कार्यक्रमात 10 लाख रुपयांच्या वाढीव खर्चाविरुद्ध महामंडळाच्या काही सदस्यांनी काेल्हापूर धर्मादाय आयुक्त कार्यालयात तक्रार दिली हाेती.तक्रारीनंतर या खर्चाची भरपाई करण्याचा आदेश सहआयुक्तांनी जानेवारी 2019 मध्ये दिला हाेता. विजय पाटकर, प्रिया बेर्डे, अलका कुबल त्या वेळी संचालक हाेते. या आदेशाची अधिकृत प्रत कलाकारांनी आता मिळवली आहे.हा आदेश देण्यापूर्वी तत्कालिन महामंडळ संचालक मंडळाची बाजू ऐकण्याआधीच निर्णय दिला गेला. ताे अन्यायकारक असून, त्या विराेधात न्यायालयात दाद मागणार असल्याचे विजय पाटकर यांच्यासह इतरांनी पत्रकार परिषदेत सांगितले.महामंडळाचे विद्यमान अध्यक्ष मेघराज राजेभाेसले यांच्या मनमानी कारभारावर या कलाकारांनी टीका केली.महामंडळाच्या आगामी निवडणुकीत त्यांना जाब विचारू, असेही विजय पाटकर यांनी स्पष्ट केले.महामंडळाचे माजी कार्यवाह रणजित जाधव म्हणाले, ‘तक्रार देण्याच्या निमित्ताने आमच्या खांद्यावर बंदूक ठेवून वापर करण्याचा प्रयत्न झाला.या कलाकारांचे वकील अ‍ॅड. सत्यजित लाेणकर म्हणाले, ‘धर्मादाय आयुक्तांच्या निर्णयाविरुद्ध न्यायालयात आव्हान देणार आहे.’ महामंडळात आकसाचे राजकारण सुरू आहे, असे विद्यमान उपाध्यक्ष धनाजी यमकर यांनी सांगितले.
 
Powered By Sangraha 9.0