बाहुलीशी विवाह केला; व्हायरल झाला

    22-Jan-2021
Total Views |
 
द्फ्घ._1  H x W
 
अलमाेटी, 21 जानेवारी (वि.प्र.)- काेणी पाळीव प्राण्यांसाेबत, तर काेणी झाडासाेबत विवाह केल्याच्या विचित्र बातम्या तुम्ही वाचल्या असतील.परंतु, कझाकिस्तानचा सनकी बाॅडी बिल्डर युरी टाेलाेचकाे याने चक्क बाहुलीशी विवाह केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे लाेकांचे भरपूर मनाेरंजन हाेत आहे. या बाॅडी बिल्डरच्या बाहुली पत्नीचे नाव मार्गाे आहे.ही बाहुली युरी जवळ बऱ्याच महिन्यांपासून आहे.ताे या बाहुलीशी इतका समरस झाला की, त्याने या बाहुलीसाेबतच विवाह केला आणि त्यांच्या या जगावेगळ्या विवाहाचा व्हिडिओ व्हायरल झाला. हा जगावेगळा विवाह मार्च 2020 मध्येच हाेणार हाेता.परंतु, लाॅकडाऊन लागू झाल्यामुळे हा विवाह हाेऊ शकला नाही. आता विवाह समारभांना परवानगी मिळताच युरीने त्याच्या लाडक्या बाहुलीशी विवाह करण्याचा निर्णय घेतला.