म्हातारपणात त्वचेला सुरकुत्या का पडतात?

    22-Jan-2021
Total Views |

ghj_1  H x W: 0
 
उत्तर : त्वचेला सुरकुत्या पडणे ही म्हतारपणाची खूण आहे. या वयात सर्वसाधारणपणे प्रत्येक व्य्नतीच्या त्वचेतील अंतर्गत संरचनेत बदल हाेत असताे. आपल्या बाहेरच्या त्वचेखाली काही कने्निटव्ह टिश्यू म्हणून संघायक उती असतात. या उती दाेन प्रकारचे प्राेटीन तंतू तसेच काेलॅजन व इलेस्टिनपासून बनलेल्या असतात. काेलॅजन संख्येने कमी असतात.ते उतींना व इलॅस्टिन तंतूंना अशा विशिष्ट द्रव्यांचा पुरवठा करतात की ज्यामुळे त्वचा लवचिक व मृदू हाेते. परंतु जसजसे वय वाढते तसतसे त्वचेवरील इलॅस्टिनची मात्रा कमी हाेत जाते व काॅलेजन तंतूंचे संतुलन बिघडते. याशिवाय काेलॅजन तंतू अधिकाधिक स्वत:तच गुंतत जातात.परिणामस्वरूप संघायक उती आपली लवचिकता गमावते. म्हातारपणात त्वचेवर सुरकुत्या पडण्याचे हेच कारण आहे.म्हातारपणाशिवाय सूर्याच्या प्रकाशामुळे सुद्धा त्वचेवर सुरकुत्या पडतात.सूर्यकिरणांमध्ये असलेल्या अल्ट्रा व्हायाेलेट किरण त्वचेला परावर्तित करण्याकरिता भाग पाडू शकतात.