उच्च व तंत्र शिक्षणच्या माेहिमेस 25 जानेवारीपासून काेल्हापुरातून हाेणार प्रारंभ

    22-Jan-2021
Total Views |
 
cdf_1  H x W: 0
 
मुंबई, 21 जानेवारी (आ.प्र.) : विद्यार्थ्यांसह पालक, शिक्षक, प्राचार्य, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यापीठ कर्मचारी, शैक्षणिक संस्थांचे प्रश्न विविध स्तरावर प्रलंबित आहेत. ते तातडीने साेडवता यावेत म्हणून ‘उच्च व तंत्र शिक्षण विभाग आपल्या दारी’ या अभिनव उपक्रमाची सुरुवात 25 जानेवारीपासून काेल्हापूरमधून करण्यात येणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली.काेराेनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षांचा आढावा घेण्यासाठी राज्यातील 13 अकृषी विद्यापीठांचा दाैरा केल्यानंतर लक्षात आले, की विद्यार्थी, पालक, शिक्षक, प्राचार्य, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यापीठ कर्मचारी, शैक्षणिक संस्थांच्या अडचणींसाठी सर्वांना संचालक, सहसंचालक, विद्यापीठ, मंत्रालय व इतर कार्यालयात जावे लागते. विशेषतः या प्रश्नांसंदर्भात वारंवार विविध प्रशासकीय कार्यालयांत भेट देऊनही विषय प्रलंबित असतात आणि यात वेळ जाताे. त्यासाठी अनेकांचा वेळ आणि जाण्या-येण्यासाठी लागणाऱ्या पैशांची बचत व्हावी म्हणून उच्च व तंत्र शिक्षण विभाग मंत्रालय, आपल्या दारी हा अभिनव कार्यक्रम राबवणार आहे, असे सामंत यांनी सांगितले. उच्च व तंत्र शिक्षण संचालक, तंत्र शिक्षण संचालक या विभागातील सर्व महत्त्वाच्या अधिकाऱ्यांना एका ठिकाणी आणून विद्यार्थी, पालकांचे प्रलंबित प्रश्न साेडवता येईल. त्यामुळे हा उपक्रम राज्यातील प्रत्येक विभागात त्या-त्या विद्यापीठात घेण्यात येणार आहे. याची सुरुवात शिवाजी विद्यापीठातून करण्यात येणार आहे, असे सामंत यांनी सांगितले.