रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी जनजागृती माेहीम राबवणार : परब

22 Jan 2021 12:05:14
 
xdfg_1  H x W:
 
नवी दिल्ली, 21 जानेवारी (आ.प्र.) : रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी जनजागृती माेहिमेत स्थानिक लाेकप्रतिनिधींची मदत घेतली जाईल.यासाठीचा कार्यक्रम राज्य शासन लवकरच आखणार असल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री अ‍ॅड. अनिल परब यांनी येथे दिली.येथील विज्ञान भवनात केंद्रीय परिवहन मंत्रालयाने आयाेजिलेल्या 40 व्या परिवहन विकास परिषदेत अ‍ॅड. परब बाेलत हाेते. परिषदेच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी हाेते. केंद्रीय परिवहन राज्यमंत्री मे.ज. (निवृत्त) व्ही.के. सिंग यांच्यासह केंद्रीय सचिव यावेळी उपस्थित हाेते. काही राज्यांचे परिवहन मंत्री प्रत्यक्ष, तर काही मंत्री दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून यात सहभागी झाले हाेते.अ‍ॅड. परब यांनी राज्यातील परिवहन स्थितीबद्दलची माहिती दिली. ऑल इंडिया परमिट मिळवणाऱ्या वाहनांसाठी काही कठाेर नियम लावावेत. तसेच, केंद्राकडून आवश्यक निधी राज्य शासनाला मिळावा, अशा मागण्याही त्यांनी केल्या.
Powered By Sangraha 9.0