5 लाख प्लॅस्टिक बाटल्यांपासून हाॅटेल

    22-Jan-2021
Total Views |
अंदमान-निकाेबार बेट निसर्ग साैंदर्याने नटलेले बेट आहे. पण पर्यटकांनी प्लॅस्टिकच्या बाटल्या वाट्टेल तिथे फेकून हे बेट विद्रूप केले. पण चार मित्रांनी मनावर घेऊन या बेटावरील प्लॅस्टिकच्या 5 लाख बाटल्या गाेळा केल्या व त्यांचा वापर करून शानदार रिसाॅर्ट (हाॅटेल) तयार केले आहे.
 
घ._1  H x W: 0
 
अंदमान-निकाेबार, 21 जानेवारी (वि.प्र.) : या रिसाॅर्टच्या भिंती, खाेल्या, इतकेच नव्हे तर स्वच्छतागृह व बाथरूमसुद्धा प्लॅस्टिक बाटल्यांपासून तयार केले आहे. अशाप्रकारे या चार मित्रांनी हे बेट कचरामुक्त करून स्वच्छ केले व फेकून दिलेल्या बाटल्यांचीही याेग्यप्रकारे विल्हेवाट लावली. या चार मित्रांची नावे जाेरावर, आदित्य, राेहित व अखिल अशी आहेत. चाैघांनी बेटावरील सर्व बाटल्या गाेळा केल्या. या बाटल्यांचे करायचे काय? असा प्रश्न निर्माण झाला, त्यावेळी त्यांनी या बाटल्यांपासून आऊट बॅक, हॅवलाॅक रिसाॅर्ट तयार करण्याचा निर्णय घेतला. लाेक त्यांची प्रशंसा करत आहेत.या बाॅटल रिसाॅर्टमध्ये 8 जंगल व्ह्यु खाेल्या, 60 सीटर कॅे असून रिकाम्या जागेत केळी आणि नारळाची झाडे लावली. 31 वर्षांच्या जाेरावर पुराेहित टूर गाइडची नाेकरी करत आहे.त्याला पर्यटक या भागात चांगले रिसाॅर्ट आहे का? चांगले जेवण काेठे मिळेल, असे विचारत असत व तसेच फ्रान्सच्या आर्किटेक्टची मदत घेतली. कारण हा आर्किटेक्ट बांधकामात प्लॅस्टिक बाटल्यांचा वापर करतात व रबरापासून फुटपाथ बनवितात. आता या चार मित्रांनी बिझनेस माॅडेल म्हणून या कलेचा वापर करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी एक काेटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.