नवी मुंबई पालिका रुग्णालयात फेब्रुवारीपासून मिळणार माेफत औषधे

22 Jan 2021 12:07:49

vgf_1  H x W: 0 
 
नवी मुंबई, 21 जानेवारी (आ.प्र.) : नवी मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांत माेफत उपचार दिले जात असले, तरी बाहेरील औषधांसाठी रुग्णांना पैसे माेजावे लागत हाेते. औषध घेण्यासाठी दिली जाणारी ‘औषध चिट्टी’ आता बंद करण्याचा निर्णय महापालिका आयुक्तांनी घेतला असून, 1 फेब्रुवारीपासून याची अंमलबजावणी हाेणार आहे.काेराेनानंतर महापालिका प्रशासनाने आपल्या आराेग्य सेवेवर लक्ष केंद्रित करत सक्षम आराेग्यसेवा देण्यासाठी काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले हेत. गेली अनेक वर्षे पायाभूत सुविधांनी सज्ज असलेली माताबाल रुग्णालयांतील सेवा वाढवण्यावर पहिल्या टप्प्यात भर देण्यात आला आहे.नेरुळ आणि ऐराेली या दाेन रुग्णालयांत अतिदक्षता व औषधाेपचार हे दाेन विभाग सुरू करत येथील खाटांची संख्या वाढवण्यात आली आहे. पुढील टप्प्यात तेथे उर्वरित सुविधांत वाढ करण्यात येणार असून, शस्त्रक्रिया विभागही सुरू करण्यात येणार आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सुविधांचे नुकतेच उद्घाटनही केले आहे. आता 1 फेबुवारीपासून पालिका रुग्णालयांत ‘औषध चिठ्ठी’ ही पद्धतच बंद करण्यात येणार आहे.पालिका रुग्णालयात माेफत उपचार हाेत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना माेठा दिलासा मिळताे. काही औषधे पालिका पुरवते. मात्र, बहुतांश औषधे बाहेरून घ्यावी लागतात. यासाठी पालिकेचे वैद्यकीय अधिकारी रुग्णांना औषध चिठ्ठी देतात. आता ही पद्धतच बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जी औषधे सातत्याने व माेठ्या प्रमाणात लागतात, तसेच जी औषधे कमी प्रमाणात लागतात यांची वर्गवारी करीत त्याचा आवश्यक पुरवठा पालिका रुग्णालयांतच उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे रुग्णांना आता माेफत उपचाराबराेबर आवश्यक सर्व औषधेही दिली जाणार आहेत.
Powered By Sangraha 9.0