उंटाला धडक बसून बाइकस्वाराचा मृत्य

22 Jan 2021 11:22:38
 
व्फ्ह._1  H x W
 
जैसलमेर, 21 जानेवारी (वि.प्र.) : आतापर्यंत 37 देश आणि अनेक खंडात बाइकवरून प्रवास करण्याची कामगिरी केलेले रिचर्ड श्रीनिवासन यांचा राजस्थानच्या वाळवंटात एका उंटाला बाइक धडकल्याने मृत्यू झाला आहे. बंगळुरूहून एका माेहिमेत भाग घेण्यासाठी ते येथे आले हाेते. ही माेहीम 8000 किलाेमीटरची आहे. बीएमडब्ल्यू बाइक ते चालवत असताना एक उंट अचानक त्यांच्या वाटेत आला आणि ते त्याला धडकले. डाेक्याला इजा झाल्याने ते जागीच मरण पावले. त्यांना या क्षेत्रातील लाेक किंग, असे काैतुकाने म्हणत असत.
Powered By Sangraha 9.0