भीती नाकारण्या पेक्षा ती व्य्नत करणे केव्हाही चांगल

    22-Jan-2021
Total Views |
 
व्फ्ग._1  H x W
 
हा प्रश्न आपण स्वतःला विचारायला हवा की, आपल्यासाठी यश काय आहे? जास्तीत जास्त पैसे? ठिक आहे, मी पैशांच्या विराेधात नाही, पण हा पर्याय एक निराेगी परिवारही असू शकताे? एक आनंदी वैवाहिक जीवन असू शकते? दुसऱ्यांना मदत करणे? प्रसिद्ध हाेणे? आध्यात्मिकदृष्ट्या मजबूत हाेणे, हे असू शकते. जेवढं तुम्ही कमावलं आहे, त्यापेक्षा अधिक चांगलं जग तयार करणे हे असू शकते? तुमचं उत्तर काळाबराेबर बदलूही शकतं. यामध्ये चुकीचं असं काहीच नाही, पण तुम्ही स्वतःला हे विचारू शकता की, तुमचं उत्तर काहीही असाे, पण यामुळे तुमचा अंतरात्मा धाेक्यात तर येणार नाही ना. पहिल्यांदा यावर जाेर द्या की, तुम्ही काेण आहात? तुम्हाला काय व्हायला आवडेल? अशा काेणत्याही गाेष्टीमध्ये वेळ वाया घालवू नका, जे तुमच्या व्यक्तिमत्त्वाच्या विरुद्ध असेल. जीवन म्हणजे लाेकप्रियतेशी मुकाबला नाही. धीट बना, पर्वतांवर चढा, पण त्याआधी माझा पर्वत काेणता, हे ठरवा. मी यशाची कशी परिभाषा करू इच्छिताे, हे ठरवा.माझ्यासाठी या पाच गाेष्टी आहेत, पितृत्व, चांगला पती हाेणे, आराेग्य, करिअर आणि मैत्री.हे माझ्या जीवनासाठी आवश्यक आहे. मी दरराेज या पाच गाेष्टींची पडताळणी करताे. यापैकी काेणत्या सेक्शनमध्ये मी आहे, हे राेज तपासताे. आपण अनेकदा आपल्या अपयशाकडेच लक्ष देताे. त्याविषयी चिंतन करताे, त्यालाच आपल्या डाेक्यात फिट करताे. आपण आपल्या डायरीत कधी लिहिताे, जेव्हा आपण उदास असताे. आपण काेणाच्या बाबतीत गाॅसिप करताे? दुसऱ्या लाेकांच्या कमतरता आणि सीमांविषयी? जर आपण चाैकस नसू तर स्वतःचा द्वेष करू लागताे.यश मिळविण्याचा सगळ्यात साेपा उपाय म्हणजे आभार. जे आपल्याजवळ आहे, जे काम आपण करताे, त्यासाठी धन्यवाद देणे. त्या सगळ्या गाेष्टींविषयी कृतज्ञ राहणे, ज्यांच्याकडे आपण दुर्लक्ष करताे. जर या सगळ्या गाेष्टींना आपण धन्यवाद दिला तर बदल्यात आपल्याला आभार मिळतात. हे साेपं आहे आणि हे कामी येते.मी दिवसातून कमीत कमी एकदा स्वतःला घाबरविण्याचा प्रयत्न करताे. मला असं वाटतं की, भीती ही एक चांगली गाेष्ट आहे, कारण यामुळे बाहेर येण्याची इच्छा वाढते. नाकारलं जाण्याची भीतीच आपल्या अडथळ्याचं कारण असते. आपण प्रमाेशन इच्छिताे, पण त्यासाठी बाेलायला घाबरताे.