एनडीएत लसीकरण माेहिमेस प्रारंभ

    20-Jan-2021
Total Views |
 
vfg_1  H x W: 0
 
पुणे, 19 जानेवारी (आ.प्र.) : खडकवासल्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबाेधिनीतही (एनडीए) काेराेना लसीकरण माेहीम सुरू करण्यात आली असून, संस्थेतील आराेग्य कर्मचारी व फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना प्राधान्याने ही लस देण्यात आली.देशभरात काेराेना लसीकरणास सुरुवात करण्यात आल्यानंतर एनडीएतही ही माेहीम सुरू करण्यात आली आहे. संस्थेचे प्रमुख लेफ्टनंट जनरल असित मिस्त्री यांच्या हस्ते खडकवासल्यातील लष्करी रुग्णालयांत या माेहिमेस प्रारंभ करण्यात आला. काेराेना काळात एनडीएचे अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या आराेग्याच्या सुरक्षेकडे लष्करी रुग्णालयातील आराेग्य कर्मचाऱ्यांनी कसाेशीने लक्ष दिले. तसेच, काेराेना प्रतिबंधात माेलाची कामगिरी बजावली.त्यामुळेच एनडीएचे कामकाज आता पुन्हा पूर्ववत हाेऊ शकले आहे, असे ले. ज.मिस्त्री यांनी सांगितले.