कासवाने सशाशी शर्यत जिंकल्यानंतरची गाेष्ट

    20-Jan-2021
Total Views |
 
cfgh_1  H x W:
 
छाेट्या मित्र मैत्रिणींनाे ससा आणि कासव यांच्या धावण्याच्या शर्यतीची गाेष्ट तुम्हाला नक्कीच माहिती असेल. काहीजणांना तर ती अक्षरश : ताेंडपाठ असेल. परंतु ही शर्यत जिंकल्यानंतर काय झालं, ह्याची गाेष्ट तुम्हाला माहिती आहे का? तर झालं असं की आपल्यापेक्षा कितीतरी हळूहळू चालणाऱ्या कासवाने शर्यत जिंकली कशी, याचं सशाला खूपच आश्चर्य वाटलं आणि हरल्यामुळे ताे खूप उदासही झाला हाेता.दुसऱ्या दिवशी ताे जेवला देखील नाही, नुसताच निराश हाेऊन झाडाखाली बसून राहिला हाेता. आपला ससेभाऊ कुठे दिसत नाही म्हणून कासव त्याला जंगलात शाेधत राहिला आणि मग शेवटी त्याला ससेभाऊ दिसला. कासव त्याच्याजवळ गेले. त्याने अतिशय मायेने सशाच्या पाठीवरून हात फिरवला आणि म्हणाला, अरे कुठे हाेतास तू. त्यावर ससा म्हणाला, का? कशाला? कशाला शाेधत हाेतास तू मला? तुला माझी खिल्ली उडवायची आहे का? तू जिंकलास मी हरलाे, झालास का तू खुश? त्यावर कासव म्हणाले, अरे नाही नाही माझ्या आईने आज तुला आवडणारा गाजराचा हलवा बनवला आहे, ताे देण्यासाठी मी तुला शाेधत हाेताे. ते एकून ससा खूपच खजिल झाला आणि कासवाला म्हणाला, साॅरी, पण मला सांग, तू तर इतका हळू चालताेस मग तू कसा बरं शर्यत जिंकलास? त्यावर कासव म्हणाला, मला त्यासाठी आपल्या मुंगीताईने मदत केली. आपली शर्यत सुरू झाली ना तेंव्हा ती मला वाटेत भेटली आणि म्हणाले, कासवबाळा एक लक्षात ठेव, माझ्यासारखी छाेटीशी मुंगी धिमेपणाने व चिकाटीने चालली तर हजाराे मैल चालून जाऊ शकेल परंतु गरूडसुद्धा जर आळसटला आणि स्वस्थ बसला तर एक पाऊलही पुढे जाऊ शकणार नाही. तुझी शारीरिक क्षमता नाही पळण्याची पण तुझ्या चिकाटीची क्षमता कमी नाही. तू चालत रहा. सशाला कळून चुकले की त्याला कासवाने नाही तर त्याच्याच आळसाने त्याला हरवले हाेते. मग दाेघांनी आनंदाने गाजराचा हलवा खाल्ला.