माहीम बीच लवकरच नवीन स्वरूपात दिसणार

    20-Jan-2021
Total Views |
 
xcvgh_1  H x W:
 
मुंबई, 19 जानेवारी (आ.प्र.) : पर्यटनमंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी माहीम बीच येथील बीच रिनाेव्हेशन, छत्रपती शिवाजी महाराज पार्क रिनाेव्हेशन, दादर टिळक ब्रीज ट्रॅफिक मॅनेजमेंट व वीर काेतवाल उद्यान रिनाेव्हेशनच्या कामांची पाहणी केली. तसेच, या कामांच्या प्रस्तावांवर संबंधित अधिकाऱ्यांसाेबत चर्चा केली. आदित्य ठाकरे यांनी या पाहणी दाैऱ्याची सुरुवात माहीम बीचपासून केली.माहीम बीचवर नवीन सी फेस तयार केला जात असून, एकूण 2460 चाैरस मीटर जागेचा हा बीच नव्याने विकसित केला जात आहे.आदित्य ठाकरे यांनी यापूर्वी येथील वृक्षाराेपणाच्या अभियानाची सुरुवात केली हाेती. या माेहिमेतून येथे जवळपास एक हजार माेठे वृक्ष व 2200 छाेटी झुडपे लावली गेली आहेत. त्यामुळे पर्यटकांना हरित बीचचा आनंद लुटता येणार आहे. या बीचनजीक करण्यात येत असलेल्या सी फेसवर ओपन जीमही बनवली जाणार आहे. ठाकरे यांनी मुंबई महापालिकेचे उपायुक्त विजय बालमवार व सहायक आयुक्त किरण दिघावकर यांच्यासाेबत वांद्रे किल्ला ते माहीम किल्ला या 5 कि.मी.च्या प्रस्तावित सायकलिंग ट्रॅकबद्दलही चर्चा केली. त्यानंतर ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज मैदानाला भेट दिली. या भेटीच्या सुरुवातीलाच त्यांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाचे दर्शन घेतले. ठाकरे यांनी या वेळी नवीन क्यूआर काेड असलेल्या दिशादर्शकांचीही पाहणी केली.