समाजाप्रति कृतज्ञ भावनेतून काम करणे गरजेचे : माेहाेळ

19 Jan 2021 12:22:32
जलतज्ज्ञ खानापूरकर यांच्यासह विविध मान्यवरांचा सन्मान
 
vfg_1  H x W: 0
 
पुणे, 18 जानेवारी (आ.प्र.) : काेराेनाच्या काळात जिल्हा, राज्य आणि केंद्रस्तरावर सगळ्यांनी एकत्रित काम केले.त्यामुळे खूप लवकर या संकटातून बाहेर पडू शकलाे. सगळ्या व्यवस्था रात्रंदिवस या काळात काम करत हाेत्या. या काळात निर्माण झालेला ताण सामाजिक संस्थांमुळे कमी झाला. समाजाप्रति असलेल्या कृतज्ञतेच्या भावनेतून जेव्हा आपण काम करताे, तेव्हा आपण ज्या क्षेत्रात काम करत आहाेत, तिथे चांगले कार्य घडते, असे मत महापाैर मुरलीधर माेहाेळ यांनी व्यक्त केले.साेशल रिस्पाॅन्सिबिलिटी आणि महा एनजीओ फेडरेशनतर्फे राष्ट्रमाता जिजाऊ जयंती, स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्ताने सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना जीवनगाैरव पुरस्कार, विवेकानंद पुरस्कार आणि जिजाऊ रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी पिंपरी चिंचवडचे पाेलिस आयुक्त कृष्ण प्रकाश, पाेलिस अधिकारी प्रेमा पाटील, रमेश अग्रवाल, महा एनजीओ फेडरेशनचे संस्थापक शेखर मुंदडा, साेशल रिस्पाॅसिबिलिटीचे अध्यक्ष विजय वरूडकर, पुरस्कार समिती प्रमुख सुनील जाेशी आदी उपस्थित हाेते.जलतज्ज्ञ सुरेश खानापूरकर यांना जीवनगाैरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डाॅ. अभिजीत साेनवणे, दिनकर कांबळे, नवनाथ जगताप यांचा विशेष सन्मान करण्यात आला. विवेकानंद पुरस्काराने मयूर बागुल, उमाकांत मिटकर, दामाेदर रामदासी, विनायक रायकर, प्रल्हाद कुटे, आनंदा थाेरात, अविनाश गाेफणे यांना सन्मानित करण्यात आले. जिजाऊ पुरस्काराने चंद्रकला भार्गव, अनिता झांबरे, मीना भाेसले, नलिनी शेरकुरे, पुष्पलता डाेके, हर्षाली चाैधरी, यती राऊत यांना सन्मानित करण्यात आले.दुर्बलतेचा परित्याग करा. आपल्या देशाला मजबूत मन आणि मजबूत देहाची गरज आहे.या दाेन गाेष्टी लहानपणापासून डाेक्यात हाेत्या आणि हे स्वामी विवेकानंदांनी शिकवले, पाेलिस अधिकारी म्हणून काम करताना या शिकवणींचा उपयाेग झाल्याचे कृष्ण प्रकाश यांनी सांगितले. प्रेमा पाटील यांनीही मनाेगत व्यक्त केले. सामाजिक कार्यकर्त्याला सक्षमता मिळाली पाहिजे. हे कार्यकर्ते एकत्र आले, तर वज्रमूठ तयार हाेईल आणि समाजात माेठ्या प्रमाणात सकारात्मक कार्य घडेल, असे मत वरूडकर यांनी व्यक्त केले.
Powered By Sangraha 9.0