अन्न आणि मनाचे जवळचे नाते

    19-Jan-2021
Total Views |
 
bgh_1  H x W: 0
 
 
असे सांगितले जाते की, जसे खावे अन्न तसे राहते मन. चाेरी, लाचलुचपत, भ्रष्टाचार, बेकायदेशीर मार्गाने कमावलेल्या पैशाने भाैतिक सुखसुविधा तर खरेदी करता येतात पण संस्कार नाही. या पैशाने मंदिराची निर्मिती हाेऊ शकते पण श्रद्धा, भ्नती मिळवता येत नाही. मंदिरात जाऊन आपल्याला शांती मिळणार नाही पण, ‘मी मंदिराची निर्मिती केली’ याचा अहंकार वाढेल. हाच तर आहे ‘मी’चा खाेटा अहंकार.आज हा यक्षप्रश्न उभा राहून उत्तर मागत आहे की, तरुण पिढी सुखी हाेऊ इच्छिते की संपन्न? संपन्नतेचा सरळ भाैतिक सुखांशी संबंध आहे. तर सुख म्हणजे मनाची शांती आहे. वास्तविक खऱ्या सुखाचा अर्थ ईश्वरदत्त जीवन व सुखसुविधांबद्दल त्याचे आभार मानणे व परिश्रमाने पुढे जाण्यासाठी प्रयत्न करीत राहणे असा आहे. बहुधा असे दिसते की, गरीब व्य्नती काही गाेष्टींचा अभाव असूननही सुखी असते.
 
काेरडी भाकरी-हसरे बालपण : आज कुटुंबात एक दाेन मुलेच असतात. ज्यांना आपल्या नाेकरी-व्यवसायामुळे दूरच्या शहरात जावे लागते. अशा स्थितीत बऱ्याचदा वृद्ध आई-वडिलांना आपल्या पूर्वजांच्या घरात राहावे लागते.
याचा अर्थ आपण आपल्या आई-वडिलांकडे लक्षच देऊ नये. सणासुदीच्या निमित्ताने एकत्र हजर राहून त्यांना आपण असल्याची जाणीवच देऊ नये, त्यांच्या सुखदु:खात त्यांना आपल्याजवळ ठेवून त्यांची सेवाच करू नये असा नाही.
 
पैसाच सारे काही आहे का? : आपण पैशाने भाैतिक सुख तर खरेदी करू शकता पण शांती नाही. उत्तम बिछाना खरेदी करू शकता पण झाेप नाही. झाेपेसाठी मन शांत असायला हवे. शांतीसाठी देवाची कृपा आणि त्याचे आभार मानण्याची सवय हवी. जेव्हा आपण हे सारे कराल तेव्हाच अहंकार संपेल. अहंकार संपला तर मुले, वृद्ध, आपलेपरके सर्वांविषयी सन्मानाची भावना उत्पन्न हाेईल. तेव्हाच भाऊबंदकीतील भांडणे संपुष्टात येतील.
 
क्राेध टाळा : जीवनात संयमाचा फार माेठा वाटा आहे.बाेलण्यावर ताबा, खाण्या-पिण्यात संयम, वागण्यात संयम.संयमाचा नियमांशी जवळचा संबंध आहे. जिथे नियम आहेत तिथे संयम असताे. जिथे संयम असताे तिथे क्राेधाला थारा नसताे. क्राेध नाही याचा अर्थ अहंकार नाही. आणि जेव्हा अहंकार संपताे तेव्हा तू चे रुपांतर ‘मी’ त हाेते आणि मी चे रूपांतर ‘तू’ मध्ये हाेते. असे असेल तर भांडायचे काेणाशी? काेणाचा मानअपमान करायचा? स्वत:चा तर अजिबात नाही.