मुलांच्या गरजा ओळखा

    19-Jan-2021
Total Views |

bgj_1  H x W: 0 
 
सध्या स्पर्धा इतकी आहे की, आपले मूल सगळ्यात पुढे असावे, असा आग्रह पालकांना हाेताे. हे आपलं पाल्य आहे की रेसचा घाेडा, असा काही वेळा प्रश्न पडताे. आपल्या मुलाच्या काही विशेष गरजा आहेत हे या पालकांनी लक्षात घेणे आवश्यक आहे. याेग्य मार्गदर्शन मिळाल्यास ही मुले कुठेही मागे पडत नाहीत.शाळेत शिकण्याच्या बाबतीत स्लाे लर्नर्स अर्थात हळू शिकणारी मुलेमुली इतर मुलांच्या तुलनेत कमी गतीने शिकतात. यांनाही वर्गात लक्ष देण्यास आणि एकाग्रता साधण्यास अडचणी येतात. दिलेले काम पूर्ण करण्यास अधिक वेळ लागताे. त्यांना काही हवे असल्यास ते सांगण्यासाठी त्यांना प्रयासाने शब्दांची जुळवाजुळव करावी लागते.
अशा मुलांचे लिहिणे अस्ताव्यस्त आढळते. लिहिताना ती आवश्यक नसलेल्या गाेष्टीही लिहितात. लेखी परीक्षेपेक्षा ताेंडी परीक्षेत त्यांना चांगले गुण मिळतात. प्रयाेग परीक्षेत मात्र दिलेल्या सूचना त्यांना परत परत सांगाव्या लागतात. ज्या मुलाला भूतकाळात फिट्स येण्याचा त्रास असेल किंवा डाेक्याला मार लागलेला असेल, अशा मुलाला स्लाे लर्निगची समस्या उद्भवू शकते.शाळेत काही मुले फळ्यावर लिहिलेले नीट दिसत नसल्यामुळे अभ्यासात मागे पडत असतात. या मुलांना लाे व्हिजन ही समस्या असू शकते. यातील काही मुलांना अगदी पहिल्या बाकावर बसूनही फळ्यावर लिहिलेले नीट दिसत नाही. पुस्तक वाचताना ही मुले ते डाेळ्यांच्या फार जवळ किंवा फार लांब धरतात. लिहिताना दाेन शब्दांमध्ये याेग्य अंतर साेडणे त्यांना जमत नाही. एका सरळ रेषेत लिहिणे जमत नाही. डाेळ्यांपासून चार-पाच मीटर दूरवरच्या गाेष्टी त्यांना ओळखता येत नाहीत. रंग, वेगवेगळी चिन्हे, संख्या ओळखताना त्यांना अडचणी येतात. काही मुलांना इतरांच्या चेहऱ्यावरच्या भावना पटकन ओळखता येत नाहीत. ही मुले एकाच वस्तूवर अधिक काळ लक्ष केंद्रित करू शकत नाहीत. शालेय वयात मुलांमध्ये अशाप्रकारची लक्षणे दिसत असल्यास त्याला लाे व्हिजन म्हणजे दृष्टी कमी असण्याची समस्या असू शकते.