ठाण्यात महापाैरांच्या उपस्थितीत लसीकरणास उत्साहात सुरुवात

    18-Jan-2021
Total Views |
शासनाच्या सूचनेनुसार पालिका पहिल्या टप्प्यात 400 आराेग्य कर्मचाऱ्यांना देणार लस
 
cdf_1  H x W: 0
 
ठाणे, 17 जानेवारी (आ.प्र.) : ठाण्यात काेराेना लसीकरण माेहिमेला उत्साहात सुरुवात झाली आहे. घाेडबंदर राेड येथील ठाणे महापालिकेच्या राेझा गार्डनिया या आराेग्य केंद्रावर महापाैर नरेश म्हस्के व महापालिका आयुक्त डाॅ. विपिन शर्मा यांच्या उपस्थितीत या माेहिमेस सुरुवात झाली. यावेळी उपमहापाैर पल्लवी कदम, स्थायी समितीचे सभापती संजय भाेईर, विराेधी पक्षनेत्या प्रमिला केणी, आराेग्य समिती सभापती निशा पाटील, नगरसेवक नरेश मणेरा, सिद्धार्थ ओवळेकर आदी उपस्थित हाेते.राेझा गार्डनिया आराेग्य केंद्रावर डाॅ.वृषाली गाैरवार यांना पहिली लस देण्यात येऊन या लसीकरणाचा प्रारंभ करण्यात आला. लसीबाबत मनात गैरसमज ठेवू नका. या लसीचे काेणतेही दुष्परिणाम नाहीत. काेराेनातून मुक्त हाेण्यासाठी ही लस उपयाेगी ठरणार असून, सर्वांनी लसीचे स्वागत करावे, असे आवाहन डाॅ.गाैरवार यांनी केले.शहरात लसीकरणास सुरुवात झाली ही आनंदाची बाब असल्याचे महापाैर म्हस्के यांनी नमूद केले.शासनाच्या सूचनांनुसार काेविशिल्ड या लसीकरणास ठाण्यात सुरुवात केली आहे. ठाण्यात 19 हजार लसींचा साठा करण्यात आला आहे. सुरुवातीला आराेग्य कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात येणार आहे. लवकरच 28 केंद्रांवर लसीकरण सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्तांनी यांनी दिली.पहिल्या टप्प्यात एकूण 400 आराेग्य कर्मचारी, सफाई कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात येणार आहे. लसीकरणासाठीचा संदेश मिळालेल्यांनीच निर्धारित वेळेत उपस्थित राहावे. नागरिकांनी विनाकारण गर्दी करू नये, असे आवाहन महापालिकेने केले आहे.