वृश्चिक

17 Jan 2021 11:30:07
या आठवड्याच्या सुरुवातीला आर्थिक प्रकारणात तुमची सक्रियता वाढेल. तुम्ही उत्पन्नाचे स्राेत वाढवण्याचा प्रयत्नही कराल. एखाद्याकडून उसने पैसेही घेऊ शकता.या काळात बाेलणे साैम्य राखावे अन्यथा हाती आलेली बाजी गमावून बसाल.
 
नाेकरी/व्यवसाय : या आठवड्यात तुमचे लक्ष कामावर कमी असेल पण आनंदाची गाेष्ट म्हणजे याचा आपल्या व्यवसाय वा नाेकरी करियरवर काेणताही दुष्परिणाम हाेणार नाही. तुम्ळी तुमच्या हाताखालील व्यक्तींवर विश्वास टाकू शकता.या आठवड्यात तुम्हाला थाेड्या विश्रांतीची गरज असेल.
 
नातीगाेती : नाती टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही तुमच्याकडून काेणतीही कमतरता ठेवू नये. त्यासाठी थाेडीफार तडजाेडही करावी लागली तरी ती अवश्य करावी. गेल्या काही काळापासून ज्या समस्येतून तुम्ही जात आहात ती साेडवण्याची वेळ आली आहे. त्यासाठी प्रयत्न करावेत.
 
आराेग्य : अनियंत्रित खाण्या-पिण्यामुळे आराेग्यासंबंधित त्रास उद्भवण्याची श्नयता आहे. ही गाेष्ट साेडल्यास या आठवड्यात तुमचे आराेग्य सुखद राहणार आहे.सकाळी फिरायला जाणे आणि व्यायामाला आपल्या दिनचर्येचा भाग बनवावे. तसेच वेळेवर समताेल आहार घ्यावा.
 
शुभदिनांक : 17, 19, 23
 
शुभरंग : पिवळा, लाल, गुलाबी
 
शुभवार : रविवार, साेमवार, मंगळवार
 
दक्षता : या आठवड्यात आजुबाजूच्या प्रत्येक गाेष्टीत सकारात्मकता शाेधण्याचा प्रयत्न करून नकारात्मक गाेष्टींकडे दुर्लक्ष करावे.
 
उपाय : जर तुम्ही कर्जान त्रस्त असाल तर लक्ष्मीपूजनानंतर श्रीगणेशाच्या प्रतिमेवर हळकुंडाची माळ घाला. यामुळे तुमचा त्रास नाहीसा हाेईल.
Powered By Sangraha 9.0