सिंह

17 Jan 2021 11:32:49
हा आठवडा तुमच्यासाठी मध्यम फलदायक असणार आहे. या आठवड्याच्या मध्यात तुमच्या जीवनात अनेक प्रकारचे चढ-उतार पाहायला मिळतील. तुमचे उत्पन्न भरपूर वाढेल. ज्यामुळे तुम्ही काॅन्फिडंट राहाल. तुमच्या मनात काही नवे करण्याचा विचार घाेळत राहील.
 
नाेकरी/व्यवसाय : या आठवड्यात नाेकरदार व्यक्तींना सुरुवातीला काही अडचणी येऊ शकतात. ते आपली नाेकरी बदलण्याचाही विचार करू शकतात.परंतु हा काळ नव्या नाेकरीसाठी अनुकूल नाही. व्यापारी वर्गाला उत्तम फायदा हाेईल. सल्लागार, लाेखंडाचे व्यापारी, इ.ना विशेष लाभ हाेईल.
 
नातीगाेती : या आठवड्यात दांपत्यजीवन उत्तम राहील आणि आपण परस्परांना समजून घेत परस्परांबाबतच्या जबाबदाऱ्या पार पाडत परस्परांना साथ द्याल. अखेरच्या दाेन दिवसांत प्रेमसंबंधात काेणत्याही प्रकारच्या अहंकाराची टक्कर हाेणार नाही याबाबत जपावे. नव्या संबंधात सुरुवात करण्यास विलंब लागेल.
 
आराेग्य : या आठवड्यात तब्बेतीत थाेडा चढ-उतार राहण्याची शक्यता आहे.ज्यांना दातदुखी, जीभेवर व्रण, खांदेदुखी असेल त्यांनी विशेष काळजी घ्यावी.रक्ताभिसरणाची समस्या असू शकते. प्रवासात घातक ड्रायव्हिंग टाळावे.
 
शुभदिनांक : 17, 19, 23
 
शुभरंग : गुलाबी, पिवळा, लाल
 
शुभवार : साेमवार, मंगळवार, गुरुवार
 
दक्षता : या आठवड्यात काेणालाही अपशब्द बाेलू नये कारण छाेटी समस्या माेठे रूप धारण करू शकते.
 
उपाय : या आठवड्यात सूर्यदेवाला अर्घ्य द्यावा. त्याची पूजाअर्चा करावी.आदित्यस्ताेत्र वाचावे.
Powered By Sangraha 9.0