मेष

    17-Jan-2021
Total Views |
या आठवड्यात आयात-निर्यातीसंदर्भात अनुकूल राहील. तुमच्या मनात एखाद्या गाेष्टीविषयी चिंता राहू शकते, पण काळासाेबत पुढे जात राहावे.तुम्हाला यश नक्की मिळेल. मन काहीसे चंचल राहील. आरामदायक जीवन जगण्यासाठी घरात काही बदल करू शकता.
 
नाेकरी/व्यवसाय : नाेकरदार जातकांना त्यांच्या श्रमाचे फळ मिळेल आणि स्वत:च्या बाॅसकडून शाबासकी मिळवण्यात यशस्वी हाेतील. या जातकांना ऑफिसात एखादे टार्गेट वा नवे काम दिले जाऊ शकते. व्यापारी उत्तम प्राफिट मिळवू शकतात. नवी गुंतवणूक करणे उत्तम राहील.
 
नातीगाेती : या आठवड्यात तुम्हाला तुमच्या मित्रांची मदत मिळवण्यात बरीच खटपट करावी लागू शकते. तुमचा बहुतेक वेळ मित्रांसाेबत संबंध सुधारण्यासाठी जाईल. तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडू शकाल. मुलांकडून शुभवार्ता समजल्यामुळे घरात आनंदाचे वातावरण राहील.
 
आराेग्य : या आठवड्यात वडिलांच्या तब्बेतीची काळजी घ्यावी लागेल तसेच त्यांच्यासाेबत वेळ घालवण्याचीही गरज आहे. महिला स्वत:ला फिट ठेवण्यासाठी वा सडपातळ हाेण्यासाठी स्वेच्छेने ब्रेकफास्ट करू शकत नाही.वास्तविक त्यांची ही सवय त्यांच्या हेतूच्या विरुद्ध काम करीत आहे.
 
शुभदिनांक : 17, 19, 23
 
शुभरंग : गुलाबी, पिवळा, लाल
 
शुभवार : साेमवार, मंगळवार, गुरुवार
 
दक्षता : या आठवड्यात हाताखालील कर्मचाऱ्यांपासून सावध राहावे.
 
उपाय : या आठवड्यात विष्णूसहस्त्रनाम व श्रीसूक्ताचा एक-एक पाठ नियमित करावा.