मीन

    17-Jan-2021
Total Views |
या आठवड्याच्या सुरुवातीला आर्थिक बाबतीत तुमची सक्रियता वाढेल. तुम्ही तुमचे कमाईचे स्राेतही वाढवण्याचा प्रयत्न कराल. एखाद्याकडून कर्जाऊ रक्कमही घेऊ शकता. या काळात स्वत:च्या बाेलण्यावर ताबा ठेवावा. अन्यथा हाती आलेले यश जावू शकते. कुटुंबीय व मित्रांसाेबत मजामस्ती कराल.
 
नाेकरी/व्यवसाय : या आठवड्यात तुमचे लक्ष तुमच्या कामावर कमी असेल आणि माैजमस्तीकडे जास्त असेल. तरीही त्याचा तुमच्या बिझनेस वा करियरवर काेणताही दुष्परिणाम हाेणार नाही. मागील काही काळापासून ज्या समस्या तुम्हाला भेडसावत आहेत त्यांचे निवारण हाेण्याची वेळ आली आहे.
 
नातीगाेती : नात्यांमधील चढ-उतारांना तुम्हाला नेहमीच सामाेरे जावे लागते. ते तुम्ही बारकाईने समजताही. तुम्हाला तुमचा अहंकार साेडून त्यावर गांभीर्याने विचार करायला हवा आणि नाती टिकवण्यासाठी तडजाेड करायला हवी कारण त्यात कुठे ना कुठे तुमचेच हित दडलेले आहे.
 
आराेग्य : आराेग्याकडे दुर्लक्ष करण्याच्या सवयीमुळे नाहक तुम्ही माेसमी आजारांच्या तावडीत सापडाल. खाण्या-पिण्याच्या अनियंत्रित सवयीमुळे पाेटासंबंधित व्याधी त्रास देऊ शकतात. डाेकेदुखी गांभीर्याने घ्या. भविष्यात माेठे रुप धारण करू शकते.
 
शुभदिनांक : 17, 19, 23
 
शुभरंग : पिवळा, लाल, पांढरा
 
शुभवार : रविवार, साेमवार, मंगळवार
 
दक्षता : या आठवड्यात दांपत्यजीवनात अहंकारामुळे वादाची स्थिती निर्माण हाेणार नाही याची काळजी घ्यावी.
 
उपाय : मंगळवारी एखाद्या घराजवळील हनुमान मंदिरात नारळ घेऊन जावे.मंदिरातच नारळ स्वत:वरून सात वेळा उतरवावा. नंतर ताे हनुमंतासमाेर फाेडावा.