कर्क

17 Jan 2021 11:34:26
हा आठवडा तुमच्यासाठी खूपच फलदायक ठरणारा आहे. आठवड्याच्या सुरुवातीला तुम्ही एखाद्या प्रवासाला जाऊ शकता. त्यात काही अडचणी येऊ शकतात. स्वत:च्या वस्तू सांभाळाव्यात. तुमच्या मनात धार्मिक विचार भरपूर येतील तसेच तुम्ही पूजाअर्चेत वेळ घालवाल.
 
नाेकरी/व्यवसाय : या आठवड्यात तुम्ही कामकाजात अत्यंत चातुर्याने पुढे जाल पण, टार्गेट पूर्ण करण्याचा तुमच्यावर दबाव असेल. त्यासाठी जास्त श्रम करावे लागतील व वेळही द्यावा लागेल. उत्तरार्धात छाेट्या कामांतून कमाई करून घ्याल. कामकाजाज प्रतिस्पर्ध्याशी सामना करावा लागेल.
 
नातीगाेती : या आठवड्याच्या सुरुवातीला तुम्ही विशिष्ट व्यक्तीसाेबत मैत्री वाढवू शकाल व पूर्वीपासून ओळख असल्यास घनिष्टता वाढेल. मध्यंतरात एखाद्या वयस्कर व्यक्तीमुळे संबंधात समस्या उद्भवणार नाही याकडे लक्ष देण्याची गरज आहे. विवाहितांना अखेरचा भाग विशेष चांगला असेल.
 
आराेग्य : या आठवड्यात तब्बेतीकडे लक्ष देण्याची गरज आहे. सुरुवातीला प्रवासात अचानक मार लागण्याची श्नयता आहे. किंवा एखादी आराेग्यविषयक समस्या उद्भवू शकते. उत्तरार्धात अतिरेकी जेवणामुळे पाेटासंबंधित त्रास हाेण्याची श्नयता आहे. अशक्तपणा असल्यास पाैष्टिक आहार घ्यावा.
 
शुभदिनांक : 17, 19, 23
 
शुभरंग : पांढरा, लाल, गुलाबी
 
शुभवार : साेमवार, मंगळवार, गुरुवार
 
दक्षता : या आठवड्यात नाहक वाद टाळावा. अपरिचितांशी संबंध जाेडण्यापूर्वी विचार करावा उपाय : या आठवड्यात केशर व हळद मिसळून शाळिग्रामावर वाहावे.
 
पुरुषसूक्ताचा पाठ करावा. लक्ष्मीमातेला मिष्टान्न अर्पण करावे.
Powered By Sangraha 9.0