कन्या

    17-Jan-2021
Total Views |
हा आठवडा तुमच्यासाठी उत्तम राहील. तुम्ही स्वत:कडे जास्त लक्ष द्याल व स्वत:चे उत्पन्न वाढवण्याचा सर्वताेपरी प्रयत्न कराल. यामुळे तुमचा फायदा हाेईल व तुम्ही आर्थिकदृष्ट्या मजबूत व्हाल. तुम्ही तुमची धाेरणे उत्तमप्रकारे राबवू शकाल. वडीलधाऱ्यांचे अनुकरण तुमच्यासाठी फायदेशीर राहील.
 
नाेकरी/व्यवसाय : या आठवड्यात प्राेफेशनल आघाडीवर महत्त्वाचे निर्णय घेणे टाळावे. सध्या भागिदारी व एकत्रित उद्याेगात तुम्ही सावध राहणे गरजेचे आहे. नवी सुरुवात करण्यासत थाेडा विलंब हाेऊ शकताे. पण नियाेजनपूर्वक पुढे जात राहाल तर दीर्घकालीन यशाची संधी लाभू शकते.
 
नातीगाेती : या आठवड्यात दांपत्य संबंधाबाबत तुम्हाला थाेडे लक्ष देण्याची गरज आहे. कारण तुमच्या जाेडीदाराच्या स्वभावात राग जास्त असेल. यामुळे नात्यात तणाव निर्माण हाेऊ शकताे. जाेडीदाराशी वा प्रियपात्राशी संवादात माेकळेपणा ठेवावा. कारण आपल्या बाेलण्याचा विपर्यास हाेऊ शकताे.
 
आराेग्य : या आठवड्यात तुम्हाला तुमचे शारीरिक व मानसिक आराेग्य जपण्यासाठी सकस आणि संतुलित आहार घेणे गरजेचे आहे. याच्या अभावामुळे तुमच्या आराेग्यावर परिणाम हाेत आहे. त्याचप्रमाणे या आठवड्यात तुम्ही कामाच्या व्यापातून विश्रांतीसाठी वेळही द्यायला हवा.
 
शुभदिनांक : 19, 20, 21
 
शुभरंग : गुलाबी, पिवळा, लाल
 
शुभवार : साेमवार, मंगळवार, गुरुवार
 
दक्षता : या आठवड्यात नव्या कामाची सुरुवात करण्यापूर्वी चांगल्या -वाईट गाेष्टींचे विश्लेषण अवश्य करावे.
 
उपाय : या आठवड्यात राेज शंकराची पूजाअर्चा केल्यास जीवनात सुखशांती व समृद्धी लाभेल.