धनू

    17-Jan-2021
Total Views |
तुम्ही तुमच्या मनातील गाेष्टी एखाद्याशी शेअर करू शकाल. एखादा जुनाट वाद एखाद्या मध्यस्थामार्फत मिटवू शकाल. एखादी महत्त्वाची हरवलेली वस्तू या आठवड्यात सापडू शकते. विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष देण्याची गरज आहे.
 
नाेकरी/व्यवसाय : या आठवड्यात तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण राखायला हवे. तुमच्यासाेबत काम करणाऱ्यांविषयीची तुमची निराशा तुमचा राग बनू शकते.तुमच्या अनियंत्रित रागामुळे तुम्ही तुमची अनेक कामे बिघडवून घेऊ शकता हे लक्षात ठेवावे. स्वत:ची क्षमता पाहूनच वरिष्ठांना एखादे आश्वासन द्यावे.
 
नातीगाेती : या आठवड्यात नात्यांबाबत काेणताही हट्ट करू नये. सर्व गाेष्टी आपल्याच मनासारख्या व्हाव्यात हाच तुमचा नेहमी प्रयत्न असताे. ज्यामुळे तुम्ही हटवादी हाेत आहात. या आठवड्यात थाेडी तडजाेड करण्याची गरज आहे. एखादे काम वा बाेलणे आवडत नसले तरी तुम्ही संतुलित राहायला हवे.
 
आराेग्य : ज्या गाेष्टी तुमचा त्रास वाढवू शकतात त्या गाेष्टींना तुम्ही तुमच्या जीवनशैलीत अजिबात स्थान देऊ नये. हृदयासंबंधित त्रासाचे तुम्ही पूर्वीच शिकार झाला आहात. तणावापासून दूर राहावे आणि स्वत:ला रिलॅक्स  राखण्याचा शक्य असेल ताे प्रयत्न करणे टाळू नये.
 
शुभदिनांक : 17, 19, 23
 
शुभरंग : भुरा, नारंगी, काळा
 
शुभवार : रविवार, बुधवार, शनिवार
 
दक्षता : एकाला जास्त एकाला कमी असा भेदभाव नात्यात करू नये. नात्यात भावनेऐवजी डाे्नयाने संतुलन राखत राहावे.
 
उपाय : या आठवड्यात दिवसाची सुरुवात काजळाने करावी. यासाठी तळहातावर काजळाची तीट लावावी. हा उपाय लागाेपाठ सात दिवस करावा.