तेलंगणामधील दाेघा विद्यार्थ्यांनी बनविले ऑर्गेनिक, सुगंधित खडू

    15-Jan-2021
Total Views |

._1  H x W: 0 x
 
हैदराबाद, 14 जानेवारी (वि.प्र.) : शैक्षणिक क्षेत्रात अनेक बदल झाले; पण वर्गात फळ्यावर लिहिण्याचा खडू बदललेला नाही. परंतु, आता तेलंगाणा स्टेट माॅडेल स्कूलमधील पी.हर्षित वर्मा आणि के. रुद्र नावाच्या दाेन विद्यार्थ्यांनी प्रथमच ऑर्गेनिक खडू तयार केला आहे.या विद्यार्थ्यांनी हा खडू तांदळाचे पीठ, लिंबाचा रस, कडूलिंबाची पाने, माती, निलगिरी, समंगी नावाचे फूल आणि काही विशिष्ट तेलांचा वापर करून हा सुगंधित खडू तयार केला आहे.खडू सुगंधित व्हावा यासाठी त्यात जास्मिन आणि चंदनाचा वापर केला आहे. सध्या वापरत असलेला खडू जिप्सम चाेकपासून तयार हाेताे.परंतु, या खडूची पावडर डाेळ्यांसाठी त्रासदायक असल्याने हा ऑर्गेनिक खडू देशभर वापरला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त हाेत आहे.