पैठण, 7 सप्टेंबर (आ.प्र.) : जायकवाडी धरणाच्या स्थानिक पाणलाेट क्षेत्रात जाेरदार पाऊस झाल्याने धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ हाेत आहे. धरण पूर्णपणे भरल्याने धरणाचे आणखी दाेन दरवाजे उघडण्यात आले आहेत. धरण भरल्याने 18 व 19 क्रमांकाचे दरवाजे अर्धा फुटाने वर उचलून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. 10, 27, 18, 19मधून 2096 क्युसेक व जलविद्युत केंद्रातून 1589 क्युसेक असा एकूण 3685 क्युसेक विसर्ग गाेदावरी पात्रात सुरू असल्याची माहिती जायकवाडीचे अधीक्षक अभियंता राजेंद्र काळे यांनी दिली. पैठण ते नांदेड अशा गाेदावरी पात्रातील 14 बंधाऱ्यांवरील यंत्रणेस दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.