महिलांनाे, मानसिक आराेग्यासाठी स्वत:ला वेळ द्या

    26-Sep-2020
Total Views |
जगात वावरताना आपल्याला अनेक प्रसंगांना सामाेरे जावे लागते. अनेकदा अप्रिय घटनाही शांतपणाने किंवा हसून साजऱ्या कराव्या लागतात.चेहऱ्यावर खाेटे मुखवटे धारण करून आपण ते प्रसंग निभावून नेताे. पण या सगळ्यांत खऱ्या भावना व्यक्त करता येत नसल्यामुळे आपली घुसमट हाेते व त्याचा परिणाम मनावर हाेताे.मनाचे आराेग्य बिघडल्यावर शरीराचा आणि जगण्याचाही ताेल चुकताे. त्यामुळे मनाचे स्वास्थ्य जपणे फार महत्त्वाचे असते. महिलांच्या बाबतीत तर ते जास्त माेलाचे असल्यामुळे त्यासाठी त्यांनी ठाेस कृती करायला हवी.
 
dtrytful_1  H x
 
 
संध्यानंद.काॅम
राेजच्या व्यवहारात आपण अनेक मुखवटे धारण करून वावरत असताे. कधी आनंदी, कधी समाधानी, कधी त्रस्त तर कधी निराश करणाऱ्या अनेक घटना सभाेवताली घडत असतात आणि वेळप्रसंग पाहून त्या मुखवट्याच्या आधारे आपण ताे क्षण निभावून नेताे. हे सगळे करताना खूप मानसिक कसरत करावी लागत असल्यामुळे आतल्या आत घुसमट हाेत असते. ती वेळेत बाहेर न पडल्यास मानसिक आजारांना निमंत्रण मिळते. सामाजिक नीतिनियम पाळण्याच्या दबावाखाली आपण आपल्या भावना दडपून टाकत जाताे आणि मग त्याचे परिणाम दिसायला लागतात.एक स्त्री तिच्या आयुष्यात एकाच वेळी अनेक भूमिका निभावत असते. आई, मुलगी, पत्नी, गृहिणी, नाेकरी करणारी करिअर वुमन अशा अनेक भूमिका ती करत असते. त्या निभावताना जबाबदाऱ्याही येतात. म्हणजे आईला मुलांची काळजी घ्यावी लागते आणि नाेकरी करणाऱ्या महिलेला घर आणि ऑफिस यांचा समताेल साधावा लागताे. पण हे सगळे करताना समाजाचे नीतिनियम पाळण्याची बंधनेही असतात आणि ती पाळताना आंतरिक घुसमट हाेत असते. प्रत्येक गाेष्टीत आपण परिपूर्ण व्हावे या महत्त्वाकांक्षेमुळे आपण आतल्या आत स्वत:ला दुबळे करत असल्याची आपल्याला कल्पनाही नसते, असे मत मानसाेपचारतज्ज्ञ डाॅ.लव्हलिन मल्हाेत्रा या व्यक्त करतात. आपली स्वप्ने आणि त्यांच्या पूर्ततेचा आनंद समजेनासा हाेताे.त्यातून भीती आणि औदासीन्याच्या भावना वाढीस लागतात. त्यामुळे स्वत:चे लाड करण्यासही आपण शिकायला हवे, असा सल्ला त्या देतात.स्त्री-पुरुष समानतेच्या गप्पा सुरू असण्याच्या या काळातही महिलांच्या मानसिकतेकडे पुरेशा गांभीर्याने पाहिले जात नाही ही वस्तुस्थिती आहे.आपला मानसिक ताण काेणाला न सांगता येणे हे महिलांबाबत वाईटच म्हणावे लागेल. कारण मनाेविकाराबद्दल आपल्यालाच दाेषी ठरविले जाण्याची भीती तिला वाटते. शिवाय एखाद्या महिलेला नैराश्य येणे किंवा भीती वाटणे हे आपल्या समाजालाही मान्य नसते!