साेशल मीडिया प्लॅटफाॅर्म वरुनही खरेदीची आता संधी

    26-Sep-2020
Total Views |
 
ewrhtrytku_1  H
 
नवी दिल्ली, 25 सप्टेंबर (वि.प्र.) : साेशल मीडिया प्लॅटफाॅर्मवरून खरेदीची संधी आता आपल्याला लवकरच मिळणार आहे.
जाहिरातींमधून कमाई करणे कमी करतानाच ई-काॅमर्स से्नटरमधून जास्त नफा मिळविण्यासाठी हे केले जाणार असून, फेसबुक, इन्स्टाग्राम, राेपाेसाे, मित्राें टीव्ही आणि चिंगारीसारख्या साेशल मीडिया अ‍ॅप्सनी नवी रणनीती आखली आहे.कंपन्यांबराेबर सहकार्य करून त्यांच्या उत्पादनांचे ब्रँडिंग आणि विक्री आपल्या अ‍ॅप्सच्या माध्यमातून करण्याची याेजना साेशल मीडिया कंपन्यांनी आखली आहे. ई-काॅमर्सपेक्षा साेशल मीडियावर लाेक जास्त वेळ घालवित असल्यामुळे असा निर्णय करण्यात आल्याचे या कंपन्यांचे म्हणणे आहे. साेशल मीडियावर जास्त वेळ वावर असल्यामुळे लाेकांना उत्पादने पाहून त्यांची निवड करणे जास्त साेपे ईल.‘इन्फ्ल्यिूएन्सर’ आणि कंपन्यांमध्ये करार करून विक्री केली जाईल.त्याबदल्यात कंपन्यांना पैसे मिळतील. ‘फाॅलाेअर्स’ची संख्या जास्त असणे ही ‘इन्फ्ल्यिूअर्स’साठी अट असेल.
 
या वर्षाअखेर प्रारंभ शक्य : काेराेना महामारी आणि परस्परांत सुरक्षित अंतर ठेवण्याच्या अनिवार्यतेमुळे ई-काॅमर्स कंपन्या तेजीत आहेत. ते पाहून या वर्षाच्या अखेरपर्यंत साेशल प्लॅटफाॅर्मवरून ई-काॅमर्स सुरू हाेण्याची शक्यता आहे.‘इन्फ्ल्यिूएन्सर’वर आधारित साेशल प्लॅटफाॅर्म या वर्षाच्या अखेरपर्यंत आम्ही सुरू करू, अशी माहिती व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफाॅर्म असलेल्या ‘राेपाेसाे’ या कंपनीचे संस्थापक-प्रमुख नवीन तिवारी यांनी दिली.
 
‘इन्फ्ल्यिूएन्सर’ना प्रशिक्षण : साेशल काॅमर्समार्फत उत्पादनांचे ब्रँडिंग व विक्री वाढविण्यासाठी ‘इन्फ्ल्यिूएन्सर’ना प्रशिक्षण देण्याची याेजना तयार करण्यात आली आहे. अशा दहा ते 15 जणांचे प्रशिक्षण ‘राेपाेसाे’ने सुरू केले आहे.
आपल्या प्लॅटफाॅर्मवर सेलिब्रिटिंना जाेडण्याची याेजनाही त्यांनी तयार केली आहे.